नाशिक जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत 6 नगरपंचायती पैकी 2 भाजप, 2 राष्ट्रवादी, 1 शिवसेना आणि एक महाविकास आघाडीकडे जागा आली आहे. सुरगाणा आणि देवळा नगरपंचायतीवर भाजपने (BJP) सत्ता मिळवली आहे. तर निफाडमध्ये 17 पैकी 7 जागा मिळवून शिवसेना विजयी ठरला आहे.
जिल्ह्यात एकूण सहा नगरपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. कृषीमंत्री दादा भुसे, भाजपच्या केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार, राष्ट्रवादी आमदार दिलीप बनकर यांना नगरपंचायत निवडणुकीत धक्का बसला आहे. दिंडोरी या ठिकाणी 17 पैकी 6 जागा मिळवून शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजपला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
तर, यावेळी निफाड नगरपंचायतीमध्ये सत्तांतर पाहायला मिळाले असून, भाजपला धक्का सहन करावा लागला आहे. निफाड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तर, राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांना धक्का बसला आहे