नागपूर: रशियाने युक्रेनवर ( Russia-Ukraine crisis) हल्ला केल्यावर अमेरिकेने सप्ष्टपणे म्हटले कि तो अमेरिकेच्या सैनिकांना लढायला युक्रेनला पाठवणार नाही. ज्यो बायडनने म्हटले कि ते रशिया त्यांच्या सॊबत लढायला तयार आहे पण अमेरिका नाही. इतकेच नव्हे तर अमेरिकेने युक्रेन मध्ये फसलेल्या अमेरीकेच्या नागरिकांना युक्रेनमधून सोडविण्यास नकार दिला आहे.रशिया आणि यूक्रेन मधील वादातुन अमेरिका साथ का नाही देत आहे ते समजून घेऊया.
सगळ्यात पहिले पहिल्या गेल्यास युक्रेन हा अमेरिकेचा शेजारी देश नाही आहे. युक्रेनमध्ये अमेरिकेचा कोणताही सैन्य अड्डा नाही. युक्रेनजवळ तेलाचा भांडार नाही आणि अमेरिका हा युक्रेनचा ट्रेड पार्टनर देखील नाही. या सगळ्यासोबतच युक्रेन नाटोचा सदस्य देखील नाही. अमेरिका राष्ट्रीय सुरक्षेच्या पलीकडे लष्करी हस्तक्षेप करत असली, तरी अफगाणिस्तानातून परतल्यानंतर, युद्धाच्या प्रकरणांमध्ये लगेच अडकू नये यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे.
बायडेन सैन्य हस्तक्षेप करत नाही!
अमेरिकेचा राष्ट्रपती ज्यो बायडेन सैन्य हस्तक्षेपपासून वाचत आहे. २००३ मध्ये अमेरिका कडून इराकवर करण्यात आलेल्या आक्रमणनंतर अमेरिकेचे सैन्य शक्तीचा वापर करण्यापासुन सावध राहत आहे. त्यांनी लिबिया आणि अफगाणिस्थानत सैनिक वाढण्याचा विरोध केला होता.
बीबीसी च्या एका रिपोर्टनुसार AP-NORC च्या सर्वेच्या सांगण्यावरून ७२ टक्के लोकांनी म्हटले कि, रशिया- युक्रेन संघर्षात अमेरिका कोणतीही भूमिका करत नाही. अमेरिका कोणत्या तिसऱ्याच देशामुळे रशिया सारख्या ताकदवर देशासोबत युद्ध करू इच्छित नाही.
युक्रेनमध्ये असा कोणताही सुरक्षा करार नाही जो अमेरिकेला जोखीम घेण्यास बाध्य करतो. नाटो देशांच्या सुरक्षेची जबाबदारी अमेरिकेची आहे . युक्रेन नाटोचा सदस्य नाही. इथे एक गोष्ट नक्की आहे की, युक्रेनचा नाटोमध्ये समावेश करू नये असे पुतीन वारंवार सांगत आहेत आणि नाटोने पुतीन यांच्या मागण्या फेटाळून लावल्या आहेत.