1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

सचिन वाझेंना 6 नोव्हेंबरपर्यंत गुन्हे शाखेची कोठडी

Spread the love

खंडणीच्या प्रकरणात आज मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. याप्रकरणी गुन्हे शाखेकडून त्यांच्या १० दिवसांची कोठडीची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर न्यायालयाने ६ नोव्हेंबरपर्यंत सचिन वाझे यांना गुन्हे शाखेची कोठडी सुनावली आहे.

तळोजा कारागृहातून तात्पुरती बदली करून नजरकैदेत राहण्यासाठी बडतर्फ केलेले मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. वाझेंना नजरकैदेत ठेवण्यास राष्ट्रीय तपास यंत्रणेने विरोध केला आहे. वाझे हा नजकैदेत ठेवल्यास पळून जाऊ शकतो आणि खटल्यातील साक्षीदारांसदर्भात छेडछाड करू शकतो, अशी भीती एनआयएने कोर्टात व्यक्त केले आहे.

दरम्यान, एनआयएने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात लिहिले होते की,’जर याचिकाकर्त्या आरोपीला नजरकैद दिली गेली, तर तो न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रातून फरार होईल आणि कथितरित्या त्याचे सहकारी असलेल्या संरक्षित साक्षीदार आणि फिर्यादी साक्षीदारांसदर्भात छेडछाड करेल, अशी सर्व शक्यता आहे. या प्रकरणात साक्षीदार कोण आहेत, याचा शोध घेणं वाझेसाठी अवघड नाही. सध्या साक्षीदारांची ओळख आणि पत्ते सुरक्षित आहेत ठेवण्यात आले आहेत. परंतु वाझेंना मुंबई परिसरातील सर्व माहिती असून तो एक प्रभावशाली व्यक्ती आहे, त्यामुळे अडचणी येऊ शकतात.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    गौरी शर्मा सुपुत्र ‘आर्यन खान’ चा जामीन ...

    October 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअभिनेता शाहरुख खानला मोठा झटका चित्रपट अभिनेता शाहरुख खान व गौरी शर्मा खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज फ...

    उद्यापासून राज्यातील नाट्यगृहे पुन्हा सुरु होणार

    October 21st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गर्दीच्या सर्व ठिकाणांवर जाणं बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारकडू...

    ‘राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत चालले आहे.’

    November 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveचंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला ...