नागपूर: मराठीचे शिलेदार बहुउदेशीय संस्था नागपूरतफे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन ऊरवेला काॅलनी येथे नुकताच ‘जागतिक मराठी भाषा गौरवदिन’ साजरा करण्यात आला. उत्साहात संपन्न झालेल्या प्रकाशन व पुरस्कार सोहळ्यात उपक्रमशील आदर्श शिक्षिका कुसुमलता दिलीप वाकडे यांना मराठी साहित्य लेखनाचा “साहित्य सेवा सन्मान पुरस्कार ” देऊन संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी सन्मानीत केले.
कुसुमलता वाकडे या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिपरी, जिल्हा भंडारा येथे पदविधर शिक्षिका म्हणून कार्यरत असून त्यांचा साहित्य, लेखन, कविता व शैक्षणिक कार्यात उत्स्फूर्त सहभाग असतो. तसेच विद्यार्थीनीकरीता शालेय स्तरावर विविध उपक्रम राबवितात. त्यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ स्तंभलेखक डॉ अनिल पावशेकर यांच्या हस्ते “साहित्य सेवा सन्मान पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
या भव्यदिव्य साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दादाकांत धनविजय, प्रमुख मार्गदर्शक डाॅ. अनिल पावशेकर, प्रा. आनंद मांजरखेडे तर प्रमुख पाहुणे म्हणून मयुर निमजे, डाॅ. सोहन चवरे, रेणुका किन्हेकर, विश्वस्त उरकुडे यांच्या उपस्थितीत 18 काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा तसेच अनेक राज्यातील 30 कवी-कवियत्रींना "साहित्य सेवा सन्मान पुरस्कार 2021 " साहित्य प्रेमींना देऊन सन्मानित करण्यात आले.
दुपारच्या सत्रात आमंत्रित कवियत्रींचे कवी संमेलन उत्साहात संपन्न झाले. या द्वितीय सत्राच्या अध्यक्ष म्हणून पुण्याच्या स्वाती मराडे यांनी अध्यक्षीय स्थान भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून कवी नागोराव कोम्पलवार होते. 15 निमंत्रित कवियत्रींनी आपल्या दर्जेदार रचना सादर करून सभागृहात टाळ्याची दाद घेऊन गेल्यात.
मान्यवरांनी आपापल्या
मार्गदर्शनात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठीची तळमळ व्यक्त केली.या देखणीय सोहळ्यचे संचालन, सतत राबणारे, होतकरू ,अभ्यासू मराठीचे शिलेदार बहुउदेशीय संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी केले तर आभार चित्रपट निर्माती कवयित्री प्राजक्ता खांडेकर यांनी मानलेत.