नागपूर: कोरोना काळात प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत ठेवणाऱ्या दहा कॉलेजवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने कारवाई केली आहे. कोरोनाकाळात आर्थिक किंवा इतर करणे देऊन कर्मचारी तसेच प्राध्यापकांचा कॉलेज छळ करत असल्याचे विद्यापीठाच्या समितीने म्हटले आहे.
प्राध्यापक हे युनिव्हर्सिटी अप्रूव्ड (विद्यापीठाने मान्यता दिलेले) आहेत.
यांचे वेतन हे सरकारच्या नॉर्मनुसार असतात आणि कॉलेजला त्यांचे वेतन अडकवता येत नाही.
एआयसीइटीच्या (AICET) अंतर्गत इंजिनीयरिंग कॉलेज येतात. कोरोना काळात कुणाचाही पगार कॉलेजेसनी थांबवू नये असा आदेश देखील एआयसीइटीने (AICET) दिला होता.
“इंजिनीरिंग विद्यापीठांचे प्रवेश आता पहिले सारखे राहिलेले नाही. त्यामुळे मॅनेजमेन्टला आधी जस प्रॉफिट व्हायच तो होत नाही आहे.
कोरोना काळात महाराष्ट्र सरकार कडून जी स्कॉलरशीप मिळते त्यामधून पगार निघत होते.
पण या वेळेस स्कॉलरशीपला जरा उशीर झाला असला तरी सरकार काही प्रमाणात ती देतेय.
परंतु मॅनेजमेन्टला प्राध्यापकांचे वेतन द्यायला कंटाळा येतोय म्हणून वेगवेगळे कारण दाखवून, त्यांचे वेतन थकीत केले आहे”,असे राष्ट्रसंत तुकोडोजी महाराज नागपुर विद्यापीठाचे (RTMNU) सिनेट आणि मॅनेजमेंट काउंसिल सदस्य विष्णू चांगडे यांनी माहिती दिली.
प्राध्यापकांकडून अशा अनेक तक्रारी विद्यापीठाकडे आल्या होत्या.
त्यामुळे यावर निकष काढायला ‘सत्य शोधन कमिटी’ बनविण्यात आली.
कमिटीने जवळजवळ दहा कॉलेजेसला भेट दिली असता असे लक्षात आले कि, कॉलेजेसकडे पैसे आहेत आणि तसेच सरकार कडून जी स्कॉलरशीप मिळते ती आज न उद्या कॉलेजेसकडे येईल.
पण प्राध्यापकांना काढण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी त्यांचे वेतन थकीत करण्यात आले होते. म्हणून विद्यापीठाने कॉलेजमध्ये एक इंटरीम रिपोर्ट सादर केला कि, कमीत-कमी सहा महिन्याचे प्राध्यापकांचे पगार काढण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.
“वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जवळजवळ ६ महिन्यापासून ते ३६ महिन्यापर्यंत प्राध्यापकांचे वेतन थकीत आहे.
यात बापूराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनिरींग, वर्धा येथे तीन वर्ष झाले पगार दिले गेले नाहीत.
विद्यापीठाकडून एक पत्रक अशा दहा कॉलेजेसला पाठविण्यात आले आहे.
तसेच आमच्या कमिटी समोर ज्या प्राध्यापकांनी आपलं म्हणणं मांडल अशा प्राध्यापकांवर त्यांच्या कॉलेजेसनी दबाव आणून त्यांना सस्पेंड केलं आणि वेगवेगळ्या प्रकारे कारवाई करत आहेत.
याचा विरोध कमिटीने केला आणि निकष काढला की, प्राध्यापकांचे थकीत वेतन देण्यात यावे आणि तसे पत्र देखील सर्व कॉलेजला पाठविले आहे.
याकरिता तीन दिवसांचा वेळ कॉलेजेसला देण्यात आला आहे.
तीन दिवसात कॉलेजेसला खुलासा करावा लागेल अथवा विद्यापीठ त्यावर निर्णय घेईल”, असेही विष्णू चांगडे म्हणाले.
कॉलेजची नावे खालीलप्रमाणे :-
१) गुरुनानक कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजि
२) बापूराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनिरींग, वर्धा
३) प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजि
४) प्रियदर्शनी इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजि
५)प्रियदर्शनी भगवती कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजि
६) अण्णासाहेब गुंडेवार कॉलेज
७) एस. बी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट अँड रिसर्च
८)जे. डी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग
९) कवी कुलगुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि अँड सायइन्स
१०) प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग