हिंगणा: महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था, डॉ. बाबासाहेब आम्बेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, समतादूत प्रकल्प नागपुर विभाग तालुका हिंगणा अंतर्गत साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ५३ व्या स्मृती दिनानिमित्ताने रायपुर (हिंगणा) येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन हिंगणा तालुका समतादूत सतीश सोमकुंवर यांनी केले. सर्व प्रथम साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक पुतळयाला माल्यार्पण व विनम्र अभिवादन करुन मानवंदना देण्यात आली.
याप्रसंगी समतादूत सतीश सोमकुंवर यांनी अण्णाभाऊ साठे यांचे विविध क्षेत्रातिल योगदान या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच सामाजिक न्याय विभाग आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ मार्फत राबविन्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपस्थित समाज बांधवांना देण्यात आली.
कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी बार्टी महासंचालक मा.धम्मज्योती गजभिये आणि समतादूत विभाग प्रमुख उमेश सोनवने, प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले यांचे मागदर्शन मिळाले. कार्यक्रमाला केशव डोंगरे, उद्धवजी बड़गे, शेखर गायकवाड, दिलीप गायकवाड़, संतोष वानखेडे रवि बावने, रेखाताई गायकवाड़ आदी समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप गायकवाड यांनी केले. आभार रवी बावने यांनी मानले.