महाराष्ट्रासह 5 राज्यांमध्ये प्रवेश
भारतात एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. देशात कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव नियंत्रणात आला असताना आता पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं डोकं वर काढलं आहे. कोरोना विषाणूच्या AY.4.2 या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. AY.4.2 भारतातील प्रकरणे आता वाढू लागली आहेत. भारतातल्या पाच राज्यात या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले.
भारतात AY.4.2 व्हेरिएंटची प्रकरणे आता कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगणा, जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्र या राज्यांमध्येही आढळून आली आहेत. या नव्या व्हेरिएंटचा अभ्यास सुरु आहे. तसंच हा व्हेरिएंट डेल्टा प्लस व्हेरियंटचाच प्रकार असल्याचं बोललं जात आहे.
सुरुवातीला इंदौरमध्ये जीनोम सिक्वेन्सिंग तपास अहवालात AY-4 चे नवीन व्हेरिएंट आढळून आली. नमुन्याच्या चाचणी अहवालात नव्या व्हेरिएंटची 7 प्रकरणं समोर आली.
ICMR ने दिली मोठी माहिती
हा व्हेरिएंट अधिक संसर्गक्षम (Caontagious) वाटत असला, तरी घातक (Fatal) असल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे घाबरण्याची काही गरज नाही, असं मत इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) या संस्थेतल्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे. तरीही नागरिकांनी कोविडच्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, असं आवाहन शास्त्रज्ञांनी केलं आहे. आतापर्यंत देशात कोरोनाच्या AY.4.2 या व्हेरिएंटचे 17 नमुने सापडले आहेत