देशात कोरोनाचे केसेस कमी झाल्याने अनेक राज्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पंजाब, हरयाणा, आसाम, राजस्थान, कर्नाटक, दिल्ली इत्यादी राज्यात शाळा आज १ सप्टेंबरपासून सुरु झाल्या आहेत.
दिल्ली सरकारने देखील कोरोना महामारीमुळे बंद असलेल्या शाळा आजपासून सुरु करत आहेत.
यात वर्ग नववा ते वर्ग बारावी पर्यंत चे वर्ग सुरु करण्यात आले आहे.
यावर प्रतिक्रिया देत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले कि, जर का आता शाळा सुरु नाही केल्या तर एक पूर्ण पिढी नॉलेज गॅप सोबत समोर जाईल.
जेव्हा शाळा सुरु करण्याबाबत प्रतिक्रिया मागितल्या तर ७० % लोक शाळा सुरु करण्याच्या सहमतीत होते.
त्यांनी सांगितले की सुरुवातीला काही दिवस अभ्यासक्रम होणार नाही, परंतु मुलांशी संवाद साधला जाईल.
वैद्यकीय तज्ञांनी सुचवले होते की तुम्हाला हवे असल्यास तुम्ही प्राथमिक शाळा उघडू शकता, पण आम्ही अद्याप उघडले नाही, विचार केला प्रथम आपण उच्च वर्ग उघडू.
सिसोदिया म्हणाले की, आतापर्यंत शाळा उघडण्याबाबत उर्वरित राज्यांचा अनुभव चांगला आहे.
पालकांनी आपल्या पाल्याला सर्व कोरोनाचे नियम समजावून शाळेत पाठवावे, शाळेत देखील नियम पाळले जातील.
पुढे अजूनही वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.
महराष्ट्रात आरोग्य मंत्री राजेश टोपे हे देखील शाळा सुरु करण्याबाबत बोलत होते.
सर्व शिक्षक आणि नॉन टीचिंग यांची लसीकरण मोहीम सुरूच आहे.
५ सप्टेंबर शिक्षक दिनाच्या आधी सर्व शिक्षक आणि नॉन टीचिंग यांचे लसीकरण पूर्ण झाले पाहिजे.
शाळा सुरु होण्याअगोदर लसीकरण होणे महत्वाचे आहे.
शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून ठरविण्यात येईल, असेही ते म्हणाले.