महाराष्ट्रातील शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतला असून 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू होणार आहेत. कोरोना प्रादुर्भाव मुळे राज्यातील शाळा बंद होत्या. परंतु आता शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्या बाबत एक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवला होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरू करण्यात येणार आहेत.
कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बहुतांश ठिकाणी लसीकरण झालं आहे. शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचं लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.