अतिरेक्याला कंठस्नान, पोलिस शहीद
श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर) : दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील परिवान गावात लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. यामध्ये जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित एक अतिरेकी ठार झाला. यावेळी अतिरेक्यांशी लढताना जम्मू आणि काश्मीर पोलिस दलातील एक पोलीस कर्मचारी शहीद झाले. तर बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत सुरु असलेल्या या चकमकीत तीन सैनिक आणि दोन नागरिक जखमी झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
‘एक अतिरेकी मारला गेला आहे. दुर्दैवाने, दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सुरू झालेल्या गोळीबारात आमचा एक पोलीस कर्मचारी रोहित कुमार चिबचा मृत्यू झाला,’ असे पोलिस महानिरीक्षक (काश्मीर झोन) विजय कुमार यांनी सांगितले.’दोन नागरिकांसह लष्कराच्या ३४ RR चे तीन जवान जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. सध्या चकमक सुरू आहे. ऑपरेशन संपल्यानंतर अधिक तपशील शेअर केला जाईल,’ असेही त्यांनी सांगितले.