टी -20 वर्ल्ड कप 2021 ला 17 ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये सुरुवात झाली आहे. टी २० वर्ल्ड कप पाच वर्षांनंतर आयोजित करण्यात आला आहे. आणि त्यापूर्वी २०१६ मध्ये तो भारतात आयोजित करण्यात आला होता. यंदा टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली. यावर्षी टीम इंडियाला आपला दुष्काळ संपविण्याची नक्कीच इच्छा आहे कारण २०१३ पासून भारताने आयसीसीचे कोणतेही विजेतेपद जिंकलेले नाही.
दरम्यान येत्या 24 ऑक्टोबरला होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान सामन्यावर सर्वांच्या नजारा आहेत. या सामन्यापूर्वी क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी क्रिकेटप्रेमींच्या प्रतिकिया येण्यास सुरुवात झाली आहे. तर आता मैदानाबाहेर वातावरण तापलेले दिसत आहे.
टी-20 आणि वनडे वर्ल्ड कपमधलं भारताचं पाकिस्तानविरुद्धचं रेकॉर्ड शानदार आहे. वर्ल्ड कपमध्ये भारत कधीच पाकिस्तानविरुद्ध हरला नाही. भारताला पाकिस्तानविरुद्ध एवढं यश का मिळालं, याचं कारण वीरेंद्र सेहवाग सांगितलं आहे. सेहवागने प्रसिद्ध वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानी न्यूज अँकरने केलेल्या तारीख बदल देंगे या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं आहे