काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि राज्यसभेचे सांसद ऑस्कर फ़र्नांडीस यांचे वयाच्या ८० वर्षी, १३ सप्टेंबर रोजी मंगलोर येथे निधन झाले.
फ़र्नांडीस योग करतांना खाली पडले, त्यानंतर त्यांना इस्पितळात नेण्यात आले होते.
फ़र्नांडीस यांची गांधी कुटुंबाशी घट्ट नाते होते. ते मागील यूपीए सरकार मध्ये केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री होते.
सोबतच राजीव गांधी यांचे ते संसदीय सचिव होते. फ़र्नांडीस यांना योग कार्याला आवडायचे तसेच ते संसदेत याचे फायदे देखील समजावून सांगत.
ऑस्कर फ़र्नांडीस काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जायचे. केंद्रीय मंत्री असून ते सेंट्रल इलेक्शन ऑथॉरिटी चेअरमेन देखील होते.
तसेच पूर्वला ते एआईसीसी चे जनरल सेक्रेटरी पदवर देखील होते.
ऑस्कर कर्नाटकचे उडुपी जिल्ह्यातून १९८० सालात पहिल्यांदा सांसद राहिले होते.
त्यानंतर ते पाच वेळा लोकसभेचे सांसद होते.
यानंतर, १९९९ वर्षात झालेल्या पराभवानंतर फर्नांडिस यांना काँग्रेसने राज्यसभेत पाठवले आणि नंतर ते अनेक वेळा राज्यसभेचे सांसद होते.
राहुल गांधी यांनी ऑस्कर फ़र्नांडीस यांच्या निधनाबद्दल ट्विटरवर दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान मोदी आणि इत्तर नेत्यांनी देखील दुःख व्यक्त केले आहे.