लोकशाहीचा खून, बंडखोरीचा विजय तर फडणवीस नाराज
मुंबई: राज्यात मागील आठ दिवसांपासून सुरु असलेली राजकीय घडामोड अखेर संपुष्टात आली. एकनाथ शिंदे यांंच्या रूपाने राज्यात ‘शिंदेशाही’ सुरू झाली असून, त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपीनीयतेची शपथ घेतली आहे. तर, मुख्यमंत्रीपदासाठी आधी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, अचानक ‘मास्टर स्ट्रोक’ मारत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र, मी सत्तेबाहेर असेल, पण सरकार चालावे ही माझी जबाबदारी असेल, असं भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होते. परंतु, केंद्रीय पातळीवर काही सूत्रे हलली आणि भाजपध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावे, असा आग्रह केला. त्यानंतर पक्षाचा आदेश मानत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
राजकीय सत्तचे समीकरण दर मिनीटाला बदलत असते यावर विश्वास बसत नसल्याचे चित्र स्पष्ट असतांना देशात लोकशाहीचा खून करून बंडखोरीचा विजय झाल्याचे अनेक बड्या नेत्यांच्या प्रतिक्रीया येत आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘शिंदे सरकार’बाबत आता आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे यांची अपेक्षा ही उपमुख्यमंत्री पदाच्या पुढची नव्हती. पण, दिल्ली किंवा नागपूर येथून आदेश आला आणि हा आदेश अखेरचा असल्याने शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आलं आहे. माझ्या मते त्यांना देखील त्याची बहुतेक कल्पना नव्हती की ते मुख्यमंत्री होणार आहे, असं पवार यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर मंत्रालयात जाऊन एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या विकासकामांबाबत भाष्य केलं आहे. महाराष्ट्रातली प्रलंबित प्रश्न पुढे घेऊन जाणार आहे. रखडलेल्या प्रकल्पांना वेग देणार आहे. माजी मुख्यमंत्री सोबत असल्याने जोरदार बॅटिंग होईल. राज्याचा विकास हेचं आमचं उद्दिष्ठ असणार आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यांच्यासोबत यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित होते. परंतु या सर्व घडामोडी अंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीसे नाराज असल्याचे समजते.