राज्याचे अन्न ,नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे काल नागपुरात होते. त्यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि त्यादरम्यान त्यांनी अनेक गोष्टींबाबत भाष्य केले. उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या कडून बाळकडू मिळालेले आहे. पूर्वी दसऱ्याची फटकेबाजी बाळासाहेब करायचे त्याप्रमाणेच उद्धव ठाकरे यांनी सुद्धा केली आणि त्यामध्ये तथ्य सुद्धा होते असे भुजबळ हे उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ बोलले आणि अलीकडच्या काळात ज्या घटना घडता आहेत आणि ते लोकांच्या लक्षात सुद्धा आले आहे.
शिवसेनेबाबत भुजबळ म्हणाले की, ‘मी शिवसेना पक्ष ओबीसींच्या हक्कांसाठी सोडली. त्यावेळी मी जीवाशी खेळून पक्षांतर केलं होतं. तेव्हापासून ओबीसींच्या हक्कांसाठी लढतोय महाविकास आघाडी सरकार ओबीसींसाठी प्रयत्न करणार आहे. आज जे प्रेम मला जनतेकडून मिळते आहे. ते अतिशय महत्वाचे आहे आणि ते माझ्या शेवटच्या श्वासा पर्यंत मिळत राहणार आहे, असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला.