नागपूर: शिवसेनेला नागपुरात पाय घट्ट रोवले पाहिजे. नागपूरमध्ये राज्याची
उपराजधानी असून हिंदुत्त्वाचा गड आहे. नागपूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढवणार आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
नागपूर महापालिकेच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नागपूर दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आज (२१ एप्रिल) राऊतांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील कामानिमित्ताने नागपूरला जाणार आहेत, असेही राऊतांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
राऊत म्हणाले, ” नागपुरात शिवसेनेची ताकद वाढवायची असेल तर नागपुरात घट्ट पाय रोवले पाहिजे. नागपूर राज्याची उपराजधानी असून हिंदुत्वाच शिवसेनेची ताकद वाढवणार आहोत. आमच्यासारखे नेते नागपूरमध्ये येतात तेव्हा लोक जमतात, आणि अनेक मान्यवर येतात. आम्ही सर्व पक्षांसोबत काम करण्याची इच्छा असून आता कसा आकार द्याचे हे पाहू. आदित्य ठाकरेही शासकीय कामासाठी जाणार असून पक्षप्रमुख देखील नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. २०२४ साली पक्ष मजबुतीच्या दृष्टीने उभे राहायचे असेल तर विदर्भात काम करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात नव्याने काम सुरू झाले असून नागपूर महापालिकेची निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना तयारी करत आहे.”
आयएनएस विक्रांत प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांना आज चौथ्या दिवशी चौकशी सुरू आहे, यासंदर्भात प्रकारांनी प्रश्न विचारल्यावर राऊत म्हणाले, “आयएनएस विक्रांत हा खूप मोठा घोटाळा आहे. आणि प्रत्येक पैशाचा हिशोब घेतला जाईल. मुंबई पोलीस सक्षम असून बाहेर येऊन कोणी कितीही बडबड केली तरी लोकांना चुकीची माहिती दिली. पोलीस तपासात काय समोर येईल. आम्ही हवेत गोळीवाबर केलेला नाही. मी पुराव्यासह बोलतो आहेत. राज्यपालांच्या कार्यालयातून आलेले पत्र हा सर्वात मोठा पुरावा आहे. सोमय्यांनी जमा केलेला कोट्यावधी राजभवनात पोहोचलेले नाही. यानंतर हे पैसे कोणाच्या खिशात, जमिनीत गेले आहेत,” असा आरोप त्यांनी केला आहे.