बीडमध्ये कॉंग्रेसला धक्का बसल्याचे वृत्त समोर आले आहे. तत्कालिन जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यासह कॉंग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश पार पडला असून उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत मोदी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
राजकिशोर मोदी यांच्याविषयी
राजकिशोर मोदी यांच्या ताब्यातील पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या राज्यभरात १७ शाखा आहेत. अंबाजोगाई नगर परिषद ३० वर्षापासून त्यांच्या ताब्यात आहे. गेल्या ३० वर्षापासून ते काँग्रेसचं काम करत होते. १४ वर्ष युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहीले आहे.
तसेत २०१३ ते २०१४ या काळते ते माहाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी होते. २००९ ते २०१८ पर्यंत ते महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन पणन महासंघ नागपूरचे उपाध्यक्ष होते.