सोलापूरच्या रजनी भडकूंबे यांच्यावर अविश्वास ठराव
उत्तर पंचायत समिती सभापती रजनी भडकुंबे यांच्यावर अविश्वास ठरावाची सभा शुक्रवारी सकाळी पीठासीन अधिकारी हेमंत निकम यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आली. प्रारंभी सभा सुरू होण्यापूर्वी सभापती रजनी भडकूंबे यांचे वडील तथा माजी पं.स.उपसभापती संभाजी भडकुंबे यांना मार्डीच्या काही गावगुंडांनी अंगावर जाऊन जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली यामुळे गोंधळ उडाला हाणामारीपर्यंत विषय गेला संभाजी भडकुंबे यांना एकटे बघून काही तरुणांनी मारहाण केली त्यानंतर सर्व पळून गेले, पोलीस बंदोबस्त नव्हता, याठिकाणी इंद्रजित पवार व भाजप तालुकाध्यक्ष आप्पासाहेब कदम हे आपल्या बऱ्याच कार्यकर्त्यांसह परिसरात थांबून होते, बराच गोंधळा नंतर पोलिसांचा ताफा दाखल झाला,
पीठासीन अधिकारी हेमंत निकम यांनी हा राजकीय वादग्रस्त विषय असल्याने पोलिसांचा बंदोबस्त मागवायला हवा होता.परंतु त्यांनी तसे केले नाही शेवटी गोंधळ झाला, हाणामारी झाली.दुपारी साडे अकराच्या सुमारास सभापती रजनी भडकुंबे यांच्यावर अविश्वास ठराव पारित झाला त्यांच्याविरोधात संध्याराणी पवार हरी शिंदे जितेंद्र शीलवंत या तिघांनी मतदान केले. ठराव पारित झाल्यानंतर तिन्ही सदस्य इंद्रजित पवार यांच्या गाडीत एकत्र बसून निघून गेले.