राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उपराजधानी असलेल्या नागपूर शहरामधील कोरोना बाधितांची संख्या कमी होती. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून कोरोना बाधितांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यात आलं असतानाच नागपुरात चोवीस तासांमध्ये नव्या 105 कोरोनाबाधितांची नोंद झाल्यानं प्रशासनावरील ताण वाढला आहे.
काल शहरात रविवारी 90 कोरोना बाधितांची नोंद झाली होती. आज शंभरी पार केल्याचे चित्र आहे. यापूर्वी मंगळवार 44 तर शुक्रवार 81 कोरोना बाधित आढळले होते. सहा महिन्यांपासून सातत्याने एक आकडी असलेली कोरोना बाधितांची संख्या अचानक तीन आकडी आल्यानं असल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. निर्बंध घातल्या नंतरही कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यानं प्रशासन आणि आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.