1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

धक्कादायक…!! NCRB च्या रेकॉर्डनुसार नागपूर गुन्हेगारीत अव्वल

thumbnail-thefreemedia
Spread the love

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून होणारे गंभीर गुन्हे पोलीस यंत्रणेसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. यामुळेच दुर्दैवाने नागपूरला राज्यातलं क्राईम कॅपिटल म्हणून ओळख मिळते आहे. ३७ लाखांच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या नागपूर शहराने वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे गुन्हे क्षेत्रात राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नागपूरने हे स्थान कायम ठेवले आहे. त्यामुळे या क्षेत्रात आता राज्यातील इतर शहरांसोबत तुलनाच होऊ शकतं नसल्याने नागपूर शहराने आपली वाटचाल राष्ट्रीय पातळी सुरू केली आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या ( NCRB) आकडेवारी नागपूरमधल्या गुन्हेगारीचं भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे. नागपूर शहरात वर्षाकाठी सरासरी शंभर खुनाच्या घटना घडतात. महत्वाची गोष्ट म्हणजे ही संख्या पाटणा,लखनौ आणि दिल्ली सारख्या शहरांपेक्षा अधिक आहे. राज्यातील पुणे हे शहर या यादीत दहाव्या स्थानावर तर मुंबई सोळाव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आता नागपूर शहरात कायद्याचे राज्य आहे की गुन्हेगारांचे या प्रश्नाचे उत्तर नागपूर पोलीस यंत्रणांना द्यावं लागणार आहे.

या संदर्भात शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे वेगळेच तर्क आहेत. त्यांच्या मते नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो कडे नागपूर शहराची लोकसंख्या २५ लाख असल्याची नोंद आहे,मात्र नागपूर शहराचा विस्तार झाला आहे. ग्रामीण नागपूरचे अनेक भागांचा नागपूर शहर पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीत समावेश झालेला आहे,त्यामुळे दर एक लाख लोक संख्येमागे हत्या प्रकरणात नागपूर शहर पहिल्या क्रमांकावर दाखवत असले तरी पोलीस आयुक्तालयाचा झालेल्या विस्तराचा या मध्ये विचार करण्यात आलेला नसल्याचं ते म्हणाले आहेत.

नागपुरात हत्येच्या घटनांचा दर ३.९ टक्के:-

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या वर्ष २०२० च्या गुन्हे विषयक अहवालानुसार दर एक लाख लोकसंख्येमागे नागपुरात हत्येच्या प्रकरणाचे दर ३.९ टक्के एवढे असून हे देशात सर्वाधिक आहे. या अहवालानुसार २०२० मध्ये बिहारची राजधानी पाटणा मध्ये हत्येची ७९ प्रकरण नोंदवली गेली असून दर एक लाख लोकसंख्या प्रमाणे पाटण्यात हत्येचे दर ३.८५ टक्के आहे. देशात कायदा सुव्यवस्थेचा बोजबारा उडण्यासाठी ओळख असलेल्या शहरांपेक्षाही नागपूरची आकडेवारी जास्त असल्यामुळे नागरिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.

Claim Free Bets

गेल्या २० वर्षात २०२२ खुनाच्या घटना:-

नागपूर शहरात २० वर्षात २०२२ खुनाचा घटना झाल्या आहेत, त्यानुसार वर्षाकाठी शंभर खून होतात. ही संख्या वाढलेली आहे ही वस्तुस्थिती आहे, मात्र ही आकडेवारी आज वाढलेली नाही. नागपुरात वर्ष २०२० मध्ये हत्येची ९७ प्रकरण नोंदवली गेली आहेत.

सहा वर्षे नागपूरचे गृहमंत्री असतांना सुद्धा गुन्हेगारीत वाढ –

नागपूर शहरात घडणाऱ्या खुनाच्या घटनांची चर्चा राज्याच्या राजकारणांच्या उपयोगाची ठरली आहे. २०१४ ते २०२० या सहा वर्षाच्या काळात राज्याचे गृहमंत्री म्हणून पाच वर्षे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर अनिल देशमुख यांच्या कडे जबाबदारी होती तरी देखील नागपूरात कायदा सुव्यवस्था बेभरवशाची झाली असून गुन्हेगार बेलगाम झाले असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    नागपुरात जागतिक विक्रम – सिंगल कॉलम पिअरवर महा...

    July 11th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमेट्रो रेल्वेसाठी सर्वात लांब डबल डेकर व्हायाडक्ट उड्डाणपूलाचे बांधकाम नागपूर: सिंगल कॉलम पिअर वर महामार्ग ...

    भाजपाने १०० टक्के लसीकरणासाठी शंखनाद आंदोलन करावे; स...

    August 30th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्रातील कोरोनाची दुसरी लाट ही ओसरली असून बहुतांश निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली. अशातच काही महत्त्वा...

    भंडाऱ्यात पोषण आहारात प्लॅस्टिकचे तांदूळ

    October 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअधिकारी म्हणतात हे तर फोर्टिफाईड तांदूळ अंगणवाडीमध्ये एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत दिला जाणाऱ्या पोषण...