एजन्सीमधील एका सायबर एक्सपर्टने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) दाखल केलेल्या एका चार्जशीटमध्ये एक धक्कादायक खुलास केला आहे. अँटिलिया कांड प्रकरणाची दिशाभूल करण्यासाठी जैश उल हिन्द नावाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधिक अहवालात माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी छेडछाड केल्याचा दावा एक्सपर्टने केला आहे. परमबीर सिंह यांनी सायबर एक्सपर्टला यासाठी पाच लाखांची लाच दिल्याचेही त्याने सांगितले आहे.
एनआयएला आपला जबाब सायबर एक्सपर्टने दिला होता. सायबर एक्सपर्टने ज्यामध्ये सांगितले की, ‘जैश-उल-हिंद’ या दहशतवादी संघटनेने अँटिलिया घटनेनंतर या घटनेची जबाबदारी स्वीकारली, असे त्यांना त्यांच्या अहवालात लिहिण्यास सांगितले होते. त्यासाठी दिल्लीत इस्रायल दूतावासासमोर स्फोट झाल्यानंतर टेलिग्राम चॅनेलचा वापर करण्यात आला.
अँटिलिया प्रकरणात समोर आलेल्या जैश उल हिन्दच्या षडयंत्रात परमबीर सिंह यांचा सहभाग असल्याचा संशय तपास यंत्रणेला सुरुवातीपासूनच आहे. पण आपल्या चार्जशीटमध्ये त्यांनी परमबीर सिंह यांचा रोल काय आहे याबाबत काही लिहिलेले नाही. पण आता सायबर एक्सपर्टने परमबीर यांचे नाव घेतले आहे.
या सायबर एक्सपर्टचा जबाब एआयएने 5 ऑगस्टला नोंदवला होता. त्याने सांगितले की, तो अनेक आयपीएसला सायबरशी संबंधित ट्रेनिंग देतो. सोबतच काही इंटेलिजेंस एजन्सी सोबतही काम करतो. 9 मार्च 2021 रोजी मुंबई पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात मी ट्रेनिंग संबंधी चर्चेसाठी गेलो होतो.
परमबीर सिंह, आयपीएस, तत्कालीन आयुक्त मुंबई यांना त्या मिटिंगमध्ये सांगितले की, जैश-उल-हिंद ज्यांच्यावर 27 फेब्रुवारी रोजीच्या अँटिलिया कांडाची जबाबदारी असल्याचा दावा करत टेलिग्राम चॅनलवर एक पोस्ट दिसली होती. मी सायबर सुरक्षा तज्ञ म्हणून दिल्लीतील इस्त्रायल एम्बेसीसमोर झालेल्या स्फोटानंतर अशाच एका टेलिग्राम चॅनलला फॉलो करत होतो. यानंतर परमबीर सिंह यांनी मला विचारले की, अशा प्रकारचा एखादा रिपोर्ट लेखी देऊ शकता का? त्यावर मी म्हटले की हे गोपनीय आहे आणि दिल्ली स्पेशल सेलने याला तयार केले आहे. या संबंधी काही लेखी रिपोर्ट मी देऊ शकत नसल्याचे मी त्यांना सांगितले.