नागपूर: संत्रानगरीत गुन्ह्यांच्या घटनात वाढ होताना दिसतेय. पोलीसांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागपूरमध्ये अशाच धक्कादायक प्रकरणाची चर्चा सुरु असून मामी-भाच्याच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या प्रकरणावरुन संताप व्यक्त केला जात आहे.
एका महिलेने आपल्या अल्पवयीन भाच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आळी आहे. मामीनेच आपल्या भाच्याचं लैंगिक शोषण केल्याच्या या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रथामिक दाव्यानुसार या महिलेने लैंगिक छळ करतानाचा व्हिडीओ शूट करुन नंतर तो व्हायरल करण्याची धमकी देत अनेकदा अशाप्रकारचा छळ केल्याची माहिती समोर आलीय.
नागपूर जिल्ह्यामधील पारशिवनी येथे हा सर्व प्रकार घडला आहे. या प्रकरणामधील आरोपी मामीचं वय हे केवळ २१ वर्ष इतकं आहे. तर पीडित भाचा हा १६ वर्षांचा आहे. या प्रकरणामध्ये आरोपी महिलेविरुद्ध पारशिवनी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या महिलेने भाच्याचा लैंगिक छळ करुन त्याचे व्हिडीओ शूटींग केलं. त्यानंतर ही व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत या महिलेने वारंवार भाच्याचं शोषण केल्याचा दावा केला जातोय.
हाती आलेल्या माहितीनुसार आरोपी महिलेने घरामध्ये कोणीही नसताना या मुलावर लैंगिक अत्याचार केले. या महिलेने लैंगिक अत्याचार करतानाचे व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये शूट केले. त्यानंतर हे व्हिडीओ दाखवून ही महिला आपल्या भाच्याला धमकावत होती. याच धमक्यांच्या जोरावर तिने त्यानंतर अनेकदा या मुलीचं लैंगिक शोषण केलं. या प्रकरणामध्ये आता पोलीस अधिक तपास करत असून लैंगिक छळाबरोबरच लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणीचा गुन्हा या महिलेविरोधात दाखल करण्यात आला असून पुढील तपास पारशिवनी पोलीस करीत आहे