हिंगणा – आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे , आदिवासी विकास विभाग , महाराष्ट्र शासन यांचे द्वारा महाराष्ट्रातील आदिवासी विभागा अंतर्गत येणाऱ्या सर्व आश्रमशाळा व वसतिगृहे यामधील सर्व विद्यार्थ्यांचे सिकलसेल ॲनिमियाच्या स्थितीचे सर्वेक्षण करणे आणि आदिवासी विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी करून कार्ड वाटप करण्याबाबतची योजना संदर्भात आज दि २० जून रोजी आकार बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था नागपूर द्वारा जागतिक सिकलसेल दिवसाचे अवचित्य साधून आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह हिवरी नगर येथे सिकलसेल तपासणी शिबीर उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला.
या शिबिराचे उद्घाटक डॉ सचिन बोगावार संचालक आकार बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था नागपूर, प्रमुख पाहुणे डॉ प्रांजल बोगावार संचालक आकार बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था नागपूर तसेच कु.शितल मामनकर गृहपाल आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह हिवरी नगर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून सरस्वती मातेच्या व आदिवासी समाजाचे जनक बिरसा मुंडा यांच्या प्रतीमेला माल्यार्पण करण्यात आले. या शिबिरात डॉ सचिन बोगावार व सिकलसेल कोऑर्डीनेटर विशाल बांदरे यांनी सिकलसेल आजाराबाबत मार्गदर्शन केले.
या शिबिरात एकूण 57 मुलींची सिकलसेल सोलुबिलीटी तपासणी केली यामध्ये 6 मुली सिकलसेल सोलुबिलीटी पॉझिटिव्ह आढळल्या. शासनाच्या या योजनेद्वारा नागपूर व नाशिक विभागाअंतर्गत सुमारे पावणे दोन लाख विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार असून सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे रोगनीदान झाल्यावर कार्ड वाटप करण्यात येतील . शिबिर यशस्वीकरीता सिकलसेल कोऑर्डीनेटर विशाल बांदरे, प्रिया मेश्राम, अंजली चौधरी, साक्षी राऊत, निकीता मेश्राम व वसतिगृहातील सर्व मुलींनी सहकार्य केले.