इंधन दरवाढीने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. इंधन दरवाढ आता नवनवीन उच्चांक करताना दिसत आहे. त्यातच केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या नेत्यांकडून पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवर नको नको ते विधान कऱण्यात येतात. आता असाच काहीसा सल्ला केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे.
पेट्रोल-डिझेल परवडत नसेल तर, सीएनजी, एलएनजी आणि इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या खरेदी करा, असा सल्ला गडकरी यांनी दिला. तसेच फ्लेक्स इंधनावर चालणाऱ्या गाड्या खरेदी कराव्यात, असंही गडकरी म्हणाले.
दरम्यान करोनाची महामारी आणि त्यानंतर आलेल्या आर्थिक अडचणी यामुळे सामान्यांना गडकरींनी सांगितलेल्या प्रकारातील गाड्या घेणे सध्या तरी कठिण आहे. सामान्य नागरिक अडचणीत असताना गडकरींनी दिलेल्या सल्ल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
याआधी भाजपच्या एका मंत्र्याने देखील असंच काहीस विधान केलं होतं. मूठभर लोक डिझेल-पेट्रोल वापरतात. 95 टक्के लोक डिझेल पेट्रोल अजिबात वापरत नाहीत. सामान्य माणसाचे उत्पन्न वाढले आहे. डिझेल आणि पेट्रोलमध्ये कोणतीही दरवाढ झालेली नाही, असं यूपी सरकारचे क्रीडा, युवा कल्याण मंत्री उपेंद्र तिवारी यांनी म्हटलं होतं. तर एका नेत्याने मोफत लसीकरणासाठी खर्च आल्याने इंधन महागलं