आणखी चार मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार: सोमय्या
किरीट सोमय्या आज अमरावतीत आले आहेत. सोमय्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. पुढच्या काही दिवसात ठाकरे सरकारच्या चार नेते, मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार आहे. या चारही मंत्र्यांविरोधातील तक्रारी विविध तपास यंत्रणांना दिल्या आहेत. या चार मंत्र्यांमध्ये दोन शिवसेनेचे आहेत. एक मुख्यमंत्री मित्र परिवारातील महत्त्वाचा सदस्य आहे. दुसऱ्याचं वर्णन करत नाही. दोन्ही मुख्यमंत्री मित्र परिवारातील सदस्य आहेत. त्यापैकी एक कॅबिनेट मंत्री आहे. तसेच काँग्रेसच्या विदर्भातील कॅबिनेट मंत्र्याचाही यात नंबर आहे. त्याचीही फाईल आली आहे. एजन्सीकडे कागदपत्रे पाठवली आहे. चौथे एनसीपीचे मंत्री आहेत, असं सोमय्यांनी सांगितलं. सोमय्यांना या मंत्र्यांची नावे सांगतली नाही. केवळ हिंट दिल्या आहेत. त्यामुळे हे मंत्री कोण? याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
खोतकरांचा घोटाळा बाहेर काढणार
यावेळी त्यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घोटाळ्यांवरही भाष्य केलं. उद्या मी जालन्यात जाणार आहे. अर्जुन खोतकरांच्या साखर कारखान्याचा घोटाळा बाहेर आला आहे. एमपीएमसी घोटाळ्याची अधिक माहिती उद्या जालन्यात देणार आहे. या घोटाळ्यात कोट्यवधी रुपयांची लुबाडणूक झाली आहे. त्याची सविस्तर माहितीच उद्या देणार असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं.
31 डिसेंबरपर्यंत 40 घोटाळे उघड झालेले असतील
ठाकरे सरकारचे घोटाळे काढण्याची जनतेने मला जबाबदारी दिली आहे. गेल्या 12 महिन्यात या सरकारचे 100 घोटाळे बाहेर काढण्यात आले आहेत. त्यातील 24 मोठ्या घोटाळ्यांचा हिशोब दिला आहे. अर्धा डझन मंत्री आणि अधिकारी सध्या जामिनावर आहेत. येत्या 31 डिसेंबरपर्यंत आम्ही 40 घोटाळे ओपन केलेले असतील. आतापर्यंत 28 घोटाळे उघड करण्यात आले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
महिलांना सुरक्षा पुरवा
आज मी अमरावतीत आलो. यावेळी मला अनेक महिलांनी निवेदने दिली. वेदना व्यक्त केल्या आहे. या महिलांना संरक्षण देण्याची मी सरकारला विनंती करणार आहे. या महिलांची सुरक्षा करण्याची जबाबदारी सरकारची आहे, असं त्यांनी सांगितलं.