नागपूर: क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले जयंती निमित्य ११ एप्रिल २०२२ सकाळी ८.३० वाजता महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशिमबाग नागपूर व माळी महासंघ, नागपूर तर्फे भव्य स्कूटर फेरीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष मा. प्रा. अरुण पवार यांचे हस्ते संस्थेच्या प्रांगणातील महात्मा फुले व सावित्रीआई फुले यांच्या पुतळ्यांना माल्यापर्ण करुन करण्यात आले.
शहरातून निघालेली भव्य स्कूटर रैली कॉटन मार्केट येथे पोहचल्यानंतर येथील महात्मा फुले व सावित्रीआई फुले येथे यांच्या पुतळयांना माल्यापर्ण करुन रैलीचा समारोप करण्यात आला. या रैलीत प्रामुख्याने माळी समाजातील सर्व संघटनेनी सहभाग घेतला. यात महात्मा फुले शिक्षण संस्था, माळी महासंघ, अखिल भारतीय माळी महासंघ, उन्मन वंशिय विकास संस्था, क्रांतीसूर्य जोतीराव फुले बिजनेस फोरम, माळी विकास संस्था, श्री संत सावता बहुउद्देशिय सेवा मंडळ, विदर्भ माळी कल्याणकारी मंडळ, महात्मा फुले समता परिषद, सावता मित्र मंडळ, क्षत्रिय कोसरे माळी महासंघ, अखिल भारतीय गासे माळी महासंघ, अखिल भारतीय लोणारे माळी महासंघ, मौर्य काछी-कुशवाहा संघ, उत्कर्ष महिला संघटना, सावित्री ब्रिगेड, मरार माळी विकास संस्था, महात्मा फुले समता शिक्षण संस्था, माळी समाज विकास संस्था इत्यादी संघटनेचे प्रतिनिधी या रैलीत उपस्थित होते.
यात प्रामुख्याने विविध पक्षांचे नेते सर्व श्री मा. नागो गाणार, शिक्षक आमदार, मा. मोहन मते, आमदार दक्षिण नागपूर, मा. अशोकराव मानकर, माजी आमदार, मा. अविनाशजी ठाकरे, सत्तापक्ष नेता व माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष, मा. बबनराव तायडे, ओबीसी महासंघ अध्यक्ष, मा. गिरीष पांडव, सामाजिक कार्यकर्ते, मा. सौ. स्वाती आखतकर, नगरसेविका, मा. मनोज गावंडे, नगर सेवक, सौ. उषा पायलट नगरसेविक, नाना लोखंडे, मधुसुदन देशमुख, गुलाबराव नाल्हे, डॉ. सुनंदा नाल्हे तसेच समाज बांधव मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
स्कुटर रैलीच्या यशस्वीते करिता संचालक मंडळ सर्व श्री. कार्याध्यक्ष प्रकाश देवते, उपाध्यक्ष गुलाबराव चिचाटे, सरचिटणीस रविन्द्र अंबाडकर, सहचिटणीस रमेश राऊत, कोषाध्यक्ष मुकेश घोळसे, थोर महापुरुष जंयती उत्सव समिती संयोजक राजेन्द्र पाटील व सहसंयोजक डॉ अभिजित पोतले, संचालक सुनिल चिमोटे, अजय गाडगे, कृष्णा महादुरे, शरद चांदोरे, मोहित श्रीखंडे, प्रकाश बोबडे, राजेन्द्र वाघे, नंदु कनेर, प्रा. पंकज कुरळकर, देवेन्द्र काटे, श्रीमती शोभा लेकूरवाळे, डॉ. अल्का झाडे, सौ. माधुरी गणोरकर तसेच माळी महासंघ नागपूर शहर आघाडीचे पदाधिकरी शंकर चौधरी, राहूल पलाडे, सचिन हिवसे, मिलिंद भोंगाडे, विनित गणोरकर, धनराज फरकाडे, राजु गाडगे, सौ. विजया अंबाडकर, सौ. सुलेखा पवार, सौ. शालिनी पवार, मायाताई हुडे, सौ. नंदा भोयर, सौ. नयना गाडगे, सौ. उज्वला पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.