नागरिकांची चिंता वाढली; भीतीचे वातावरण कायम
मागील काही दिवसांपासून श्रीलंका अर्थिक संकटाच्या फेऱ्यात गर्ता घेत असून हे संकट आणखी गडद होण्याची स्थिती श्रीलंकेवर आली आहे. कारण श्रीलंकेत पेट्रोल संपले आहे. परकीय चलनाचा साठा संपला आहे. परदेशातून तेलासारख्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी श्रीलंकेकडे पुरेसे पैसे नसल्याचं श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी स्पष्ट केलं आहे.
दैनंदीन गरजेच्या वस्तू न मिळाल्याने नागरिक ही चिंतेत आहेत याचाच अर्थ आज श्रीलंकेची गाडी ठप्प होणार आहे. श्रीलंकेचा परकीय चलनाचा साठा संपला आहे. इतर देशांतून पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅस, औषध यासारख्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी पुरेसा पैसा शिल्लक नाही. 15 तास वीज कपात आणि महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे.
पंतप्रधान रानिल विक्रम सिंघे यांना देशाचा खर्च चालवण्यासाठी 2.4 ट्रिलियन श्रीलंकन रुपयांची गरज आहे. तर सरकारला मिळालेला महसूल केवळ 1.6 ट्रिलियन श्रीलंकन रुपये आहे. त्याची भरपाई म्हणून श्रीलंकेतील मालमत्ता विकण्यापर्यंत मजल गेली आहे. आता श्रीलंका सरकारने सरकारी विमान कंपन्या खासगी हातात देण्याचा निर्णय घेतला आहे.