गेल्या महिन्याभरापासून एसटी कर्मचारी हे राज्यात विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर गेले आहे. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांसाठी आज २४ नोव्हेंबर रोजी महत्वाची बैठक असणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना अंतरिम वेतनवाढचा प्रस्ताववर चर्चा होणार आहे. या बैठकीनंतर एसटी कर्मचारी त्यांचा संप मागे घेणार का? की विलीनीकरण करणार ठाम राहणार, हे बैठकीनंतर कळेल. परंतु, या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
अनिल परबांनी काल (२३ नोव्हेंबर) सह्याद्री अतिथीगृह एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत परबांनी भाजप नेते गोपीनाथ पडळकर, आमदार सदाभाऊ खोत आणि एसटी कर्मचाऱ्याचे शिष्टमंडळ यांच्यासोबत जवळपास दोन तास चर्चा झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती प्रसार माध्यमातून मिळाली आहे.
विलीनीकरण करणारा मुद्दा कोर्टात आहे. पडळकर, खोत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळातील सदस्यांशी चर्चा झाल्या परब म्हणाले, ‘एसटी विलीनीकरण करणारा मुद्दा हा कोर्टात आहे. यामुळे सरकार यावर निर्णय घेऊ शकत नाही. कोर्टाकडून नेमलेल्या समितीने १२ आठवड्यात आपला अहवाल द्यायचा आहे. समितीचा जो काही अहवाल असेल तो राज्य सरकारला मान्य असेल,’ असे परब म्हटले. एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांचा संप थांबवण्यासाठी
सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना अंतरिम पगारवाढीचा प्रस्ताव दिला आहे.