नागपूर: आपत्ती व्यवस्थापन प्रात्याक्षिक ट्राफी स्पर्धा २०२२ चे स्पर्धेसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर व राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे या दोन दलांमध्ये दिनांक १४ ते दिनांक १५ रोजी श्री पंकज डहाणे समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र ४ नागपूर तथा (अतिरिक्त कार्यभार पोलीस उपमहानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल, नागपूर) यांचे अध्यक्ष तथा मार्गदर्शनाखाली सादरीकरण करण्यात आलेली होती.आपत्ती व्यवस्थापन प्रात्याक्षिक ट्रॉफी स्पर्धा सन-२०२२ चे सांगता समारंभ राष्ट्रीय आपदा मोचन बल अकादमी, नागपूर येथेदि १६ फेब्रु. रोजी सांगता समारोप समारोह संपन्न झाला. २०१६ पासून फिल्ड क्राफ्ट ट्राफी स्पर्धा आयोजीत करण्यात येत असते, सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. प्रमोद लोखंडे, सहायक समादेशक, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, नागपुर यांनी केले.
सदर प्रात्याक्षिके श्री प्रमोद लोखंडे, सहायक समादेशक (DYSP) राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर यांचे नियंत्रणामध्ये दिनांक १४/०२/२०२२ रोजी सकाळाच्या सत्रात टिम कमांडर/ पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप बी. भजने राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपुर यांचे नेतृत्वामध्ये टिम मधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दल मुख्यालय (HQ) नागपूर येथिल मैदानावर ध्वस्त ढांचा खोज एवमं बचाव + एमएफआर मध्ये आपत्ती ला परिभाषीत केले तर हि एक घटना आहे ज्या मध्ये जीवीत व मालमत्तेची मोठया प्रमाणात हानी होत असते. आणि आपत्ती ग्रस्त क्षेत्रात ला पूर्वपदावर येणाकरिता बाहेरील मदतीची आवश्यकता असते.
आपत्ती ही प्राकृतिक असो किंवा मानवनिर्मित ही केवळ आर्थीक, सामाजिक व्यवस्थेला प्रभावीत करते आणि देशाच्या विकास ला मागे घेवून जाते. आपत्ती ही एक असामान्य घटना आहे जे काही वेळासाठी येथे आणि आपले प्रभाव जास्त काळा पर्यत आपले छाप सोडुन जाते. आपण आपत्ती ला रोखू शकत नाही. परंतू त्यांचा पासून होणारे नुकसानीला कमी करता येते. सदर प्रत्याक्षिकामध्ये बचावकतांचे व साहीत्यांचे योग्य नियोजन करुन क्रमनिहाय अडकलेल्या जखमी व्यक्तींचा शोध घेणे, त्यांचे पर्यंत पोहचने व त्यांना स्थिर करुन सुरक्षितरित्या घटनास्थळातून बाहेर काढणे तसेच त्यांचेवर प्रथमोपचार करुन त्वरीत वैद्यकीय उपचाराकरिता वैद्यकीय अधिकारी आपातकालीन सेवा यांचे कडे रितसर सोपविणे.
दिनांक १५/०२/२०२२ रोजी दुपारच्या सत्रात राष्ट्रीय आपदा मोचन बल अकादमी, नागपूर या ठिकाणी टिम कमांड/पोलीस निरीक्षक श्री.एम. वाय. मोहोड राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपुर यांचे नेतृत्वामध्ये टिम मधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी उंच इमारत मध्ये अडकलेल्या लोकांचे बचाव + एमएफआर (High-Rise Rope Rescue + Medical First Responder ) मध्ये भुकंपग्रस्त इमारती मधील धोका दूर करुन त्यामध्ये अडकलेल्या व्यक्तींना शोधने, त्यांचे पर्यंत पोहचने व त्यांना स्थिर करुन सुरक्षितरित्या बाहेर काढने तसेच त्यांचेवर प्रथमोपचार करुन त्वरीत वैद्यकीय उपचाराकरिता वैद्यकीय अधिकारी आपातकालीन सेवा यांचे कडे रितसर सोपविणे या दृश्यांचे उत्कृष्ट प्रात्याक्षिकाव्दारे राष्ट्रीय आपदा मोचन बल अकादमी, नागपुर येथिल पर्यवेक्षक अधिकारी यांचे समक्ष सादरीकरण करण्यात आले आहे.
राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे येथील वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री. गणेश पी. लोहार यांचे नेतृत्वात टिम मधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वरील प्रमाणे प्रत्याक्षिकांचे सादरीकरण केले. दिनांक १४.०२.२०२२ व दिनांक १५/०२/२०२२ रोजी घेण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन प्रात्याक्षिक ट्रॉफी स्पर्धा सन २०२२ मध्ये एफडब्लुआर + एमएफआर व हायराईज+एमएफआर या दोन आपत्ती विषयक प्रात्याक्षिकांमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर या दलाने उत्कृष्ठरित्या सादरीकरन करुन प्रथम क्रमांक पटकविले आहे. तसेच सीएसएसआर+एमएफआर या आपत्ती विषयक प्रात्याक्षिकांमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर व राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे या दलांना मिळून प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे.