नागपूर/वाडी :- बहुजन समाज पार्टी वाडी शहर नागपूर व स्थानिक नागरिकांच्या वतीने आज चंद्रमणी चौक आंबेडकर नगर वाडी येथील डंपीग यार्ड (ओला,सुखा कचरा) हटविण्यात यावे ह्या मागणीकरता वाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजय देशमुख यांना नगरपरिषद कार्यालयात बसपाच्या वाडी शहर शिष्टमंडळाने आज दि २१ जून रोजी मागणीचे निवेदन दिले.
चंद्रमणी चौक आंबेडकर नगर वाडी येथील परिसरात डंपीग यार्ड असल्यामुळे येथील नागरिकांना दुर्गंधीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. ओला कचरा, सुखा कचर्यापासून पावसाळ्यात डास, डेंगु, मलेरिया, कावीळ ह्या साथीच्या रोगाची लागवन मोठ्या प्रमाणात होत असते. तर अनेक लोकांच्या घरात साप, जंतू, किटक,किडे प्रवेश करतात, तर सतत घरांमध्ये दुर्गंधी येत असते यामुळे येथील नागरिकांचे जीवनमान धोक्यात आलेले आहे. अनेकदा नगर परिषदेला निवेदन देण्यात येवुन सुद्धा योग्य कार्यवाही झालेली नाही.
ह्यावेळेस मात्र वाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी देशमुख साहेबांनी मात्र दोन ते तीन महिण्याच्या आत डंपीग यार्ड हलविण्यात येईल आणि त्या करिता जागेची पण निवड केली गेली आहे, संबधित अधिकारी वर्गाला बोलवून तात्काल कामाचे आदेश काढायला दिले आहे. लोकांना दुर्गंधीचा त्रास होवू नये म्हणून औषधांची फवारणी उद्यापासुनच करा, असे आदेश दिले आपली रास्त मागणी असून तात्काळ दखल घेण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी बहुजन समाज पक्षाच्या वतीने जे निवेदन देण्यात आले. यावेळी सुधाकर सोनपिपंळे वाडी झोन प्रमुख, गौतमजी मेश्राम अध्यक्ष वाडी शहर, माजी नगरसेवक नरेंद्रजी मेंढे, गौतमजी तिरपुडे, सुरज वानखेडे, दिंगाबर मेश्राम, सुमनबाई मेश्राम, गोपालजी मेश्राम, वंदना मेश्राम, आशा पाटिल, छाया रंगारी, सुनंदा लोखंडे, कल्पना बालपांडे, आशा घुटके, सुनिता मेश्राम, शारदा देशभ्रतार, सरला आवळे, राजेंद्र पाटील, नाशिक सोमकुवर, राजेश गवई, राहुल मेश्राम, किशोर टेंभूर्णे, प्रदिप नाईक, साहिल खोब्रागडे, मनिष रामटेके, दर्पण लोणारे, सुभाष सुखदेवे, प्रदीप मस्के, सुखदेव झटाले, विरेंद्र कापसे, सतीश डोंगरे, कुणाल मेश्राम, अध्यक्ष बसपा हिंगणा महेश वासनिक अनेक कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.