बुधवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने दिवाळीत बदल्या करणेबाबत व पेसा, दुर्गम भागातील शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी सुरु ठेवावी याबाबत मा.ना. हसन मुश्रीफ साहेब, ग्रामविकास मंत्री, खाजगी सचिव मा. रविंद्र पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा करणेत आली.
शिष्टमंडळाच्या वतीने दिवाळी सुट्टी मध्ये कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन किंवा ऑफलाईन जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या झाल्याच पाहिजेत असा आग्रह धरणेत आला. सर्व कर्मचार्यांच्या प्रत्येक वर्षी बदल्या होतात, पण शिक्षकांच्या मात्र गेल्या दोन वर्षात बदल्या झालेल्या नाहीत तसेच आपल्या ग्रामविकास विभागाने शाळा सुरु झाल्यानंतर बदल्या करु असे परिपत्रक काढले होते. ही बाब मंत्रीमहोद व सचिव यांच्या निदर्शनास आणून दिली .
बदल्या न झाल्यामुळे शिक्षकांच्या मध्ये संतापाची लाट आहे . तेंव्हा कोणत्याही परिस्थितीत बदली प्रक्रिया सुरु करणेत यावी . तसेच बदलीसाठी ३० जून व विस्थापित ,गैरसोयीत असणाऱ्या सर्वांसाठी सेवेची अट ३ वर्षे करणे बाबतचे शुद्धीपत्रक बदली आदेशापूर्वी काढण्यात यावे अशी विनंती केली.
तसेच दुर्गम व पेसा क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मिळाल्या नंतर ही एकस्तर वेतन श्रेणी सुरु ठेवावी असा आदेश काढण्यात यावा. अशी विनंती केली. यावेळी मंत्री महोदय म्हणाले की, सॉफ्टवेअर तयार करायला सुरु झाले आहे . परंतु किमान दोन ते तीन महिने लागतील . ऑफ लाईन बदल्या कशा करता येतील याबाबत सर्व अधिकऱ्यांबरोबर चर्चा करुन निर्णय घेवू व एकस्तर बाबत ही निर्णय घेवू
तसेच मा.राजेंद्र पवार, उपसचिव, शालेय शिक्षण यांचीही भेट घेवून समग्र शिक्षा अभियानचे २००१ पासून आतापर्यंतचे अनुदान हिशोब मागू नये बाबत चर्चा केली व निवेदनही दिले. शिष्टमंडळामध्ये राज्याध्यक्ष राजाराम वरुटे, राज्यसरचिटणीस केशवराव जाधव, शिवाजी चवले, पांडुरंग शिळीमकर, राहूल लोंढे, विजय भरम, पांडुरंग शिंदे आदी उपस्थित होते .