भंडारा जिल्ह्यातील इतिहासकालीन असलेल्या लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या (मनरो) १८६५ साली बांधण्यात आली. पण या शाळेच्या ऐतिहासिक वारसाला धक्का लागतो आहे. कारण शाळेच्या पटांगणात काही कमर्शिअल कॉम्प्लेक्सचे अवैध बांधकाम सुरू होते.
१५ ऑगस्टपासून त्या शाळेच्या पटांगणात कमर्शिअल कॉम्पलेक्सचे बांधकाम सुरू करण्यात आले. त्यात ७० दुकानांचे बांधकाम शाळेच्या मैदानावर करण्यात येणार आहे. त्याकरीता शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका (PIL) टाकली आहे. त्या विद्यार्थ्यांनी “शाळा बचाव समिती” देखील स्थापन केली आहे. सध्या या बांधकामाला कोर्टाकडून स्टे ऑर्डर देण्यात आला आहे.
जिल्हा परिषद भंडारा, हे तिथे कॉम्प्लेक्स बांधत आहे, तसेच त्यांची ती जागा आहे असेही ते म्हणत आहेत आणि याच्या करता जे ठराव झाले ते आयत्या वेळेस केले गेले असे ठराव नियमाप्रमाणे करता येत नाही. त्याच्या अजेंड्यावर ते विषय पाहिजे ते कधीच नव्हते, अशी माहिती अॅड. कुलकर्णी यांनी द फ्री मीडिया ला दिली.
मनरो शाळेची जुनी इमारत होती. तेथे ११ अजून युनिट्स बांधण्यात आलेले आहेत. शाळा काही वर्षानंतर मोठी होत गेली आणि तसा तिचा विकास देखील होत गेला. पण हे ११ युनिट्स न दाखवता फक्त जुनी १८६५ सालची इमारत दाखवून नकाशे पास करून घेतले आणि तीन साईटवर बांधकाम होणार होत. त्यापैकी दोन साईटचे बांधकाम एकाच ठिकाणी करण्यात आले आहे. त्याच्यामध्ये बचत भवन होता, प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट निवासस्थान होत, आणि सात ब्लॉक्स बांधणार होते हे सगळं बांधकाम दुसऱ्या साईटवर करण्यात येणार होते. परंतु जेव्हा टेंडर काढले त्यावेळेस हे सगळं मनोरो शाळेच्या पटांगणातच दाखवण्यात आले, असेही अॅड. कुलकर्णी म्हणाले.
१) जिल्हापरिषदेचे ठराव हे अनधिकृत आहेत कारण नियमने ते झालेले नाहीत.
चुकीच्या योजनेला (प्लॅनला) मंजुरी देण्यात आली आहे.
२) सरकारने विचार न करता याला मान्यता दिली आहे.
३) शाळेच्या इमारतीमध्ये असं बांधकाम करता येत का? हा मूलभूत प्रश्न आहे.
४) याच्यामुळे शाळेच पटांगण हे पूर्ण नष्ट होणार आहे.
पुरातत्व विभागाने देखील या बांधकामावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे कोर्टाच्या आदेशानुसार कुठलेही बांधकाम करता येणार नाही. या शाळेचे ऐतिहासीक महत्व देखील आहे. अनेक राजस्तरीय खेळ घेण्यात आले आहे. सध्या या बांधकामावर कोर्टाकडून स्टे ऑर्डर मिळाला आहे.
भंडारा जिल्ह्यातील इतिहासकालीन असलेल्या लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या (मनरो) पटांगणात दुकान गाळ्यांचे बांधकाम थांबविण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून तसेच शाळेतील माजी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. त्यामूळे सदर बांधकामाला मोठ्या प्रमाणात सामाजिक संघटना, काही पक्ष तसेच शाळेचे आजी-माजी विद्यार्थ्यांचा विरोध होता. मनरो शाळेतील पटांगणातील बांधकामाविषयी मनरो शाळेतील प्राध्यापिका बोकडे यांना विचारले असता त्यांनी याविषयी बोलणे टाळले होते.