1. Coronavirus pandemic live updates: India reports a single-day rise of 253 new Covid cases in India 2. ‘I carry India with me wherever I go’: Google and Alphabet CEO Sundar Pichai 3. Aaftab used Chinese knife to dismember Shraddha's body, chopped her 1. कोरोनाव्हायरस (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला लाइव्ह अपडेट्स: भारतात एकाच दिवसात 253 नवीन कोविड प्रकरणांची नोंद झाली आहे 2. ‘मी जिथे जातो तिथे भारताला माझ्यासोबत घेऊन जातो’: गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई 3. श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी आफताबने चायनीज चाकू वापरला, आधी तिचे हात कापले: सूत्र

भाजयुमोच्या मागणीला यश, विद्यापीठाने फी वाढीच्या निर्णयाला दिली स्थगिती!

Rashtrasant-Tukadoji-Maharaj-Nagpur-University-

-युवा मोर्चाने विद्यापीठाची मैनेजमेंट काउंसिल ची बैठक उधळुन लावली


भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगराद्वारे २९ ऑगस्ट रोजी नागपुर विद्यापीठाविरोधात आंदोलन करण्यात आले. कोणालाही विश्वासात न घेता या शैक्षणिक वर्षापासुन २०% फी वाढ करण्यात आली होती. कोव्हिडची परिस्थिती लक्षात घेता आता कुठे सर्व वातावरण स्थिरस्थारावर होत आहे. तसेच संपुर्ण पुर्व विदर्भावर ओल्या दुष्काळाचे सावट देखील आहे. अश्या परिस्थितीमध्ये २०% फी वाढ ही विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी अतिशय मोठा भुरदंड असु शकतो. हा विषय घेऊन भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडीने हे आंदोलन केले.

आज पासुन १० दिवसांच्या अगोदर भाजयुमो विद्यार्थी आघाडीने विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूंना निवेदन दिले होते. पण त्यावर विद्यापीठाने काहीही कारवाही केलेली नाही. ॲडमिशनचे दिवस येऊ लागललेले आहेत तरीही काही निर्णय विद्यापीठ घेतांना दिसत नव्हते. काल विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीची बैठक होती.

भाजयुमोचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट व्यवस्थापन समितीच्या बैठकीतच धडक दिली व असा आग्रह केला की बैठकीत अगोदर फी वाढीचा निर्णय घ्यावा व नंतर इतर मुद्यांवर चर्चा करावी. कुलगुरूंनी विनंती मान्य करून व्यवस्थापन समितीच्या बैठकीत अगोदर फी वाढीच्या निर्णयाला स्थगिती दिली व ही माहिती युवा मोर्चाला कळवली व नंतर पुढील बैठकीला सुरवात केली.

या आंदोलनाला प्रमुख्याने भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे, भाजयुमो प्रदेश सचिव कल्याण देशपांडे, भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले , प्रदेश सदस्य देवा डेहणकर, रितेश राहाटे, शहर महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत, मंडळ अध्यक्ष बादल राऊत, निलेश राऊत, सन्नी राऊत, पंकज सोनकर हे उपस्थित होते.

आंदोलन भाजयुमो विद्यार्थी आघाडीचे शहर संयोजक संकेत कुकडे यांच्या नेतृत्वात झाले. सोबत सह-संयोजक गौरव हरडे, सुभाष खेमानी, आशिष मोहिते, शिवाम पंढरीपांडे, प्रशांत बघेल, साहिल गोस्वामी, प्रणित पोचमपल्लीवार, कौस्तुभ बैतुले व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Avatar

RENUKA KINHEKAR

All Posts

Latest News

Related Post

उत्तर प्रदेश: निवडणुकीच्या रिंगणात अखिलेश यादव यांची...

January 3rd, 2022 | RAHUL PATIL

पूर्वीच्या नकारघंटेला पूर्णविराम उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणुक लढणार असल्याचे जाहीर केल्यानंतर स...

उपराजधानीत झाले शिवबंधन सैल

August 31st, 2021 | RAHUL PATIL

महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे यांनी परवाच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प...

रोटरी क्लबतर्बे पाणी टंचाईच्या गावात वाॅटर वेलोचे वितरण

May 25th, 2022 | RAHUL PATIL

हिंगणघाट: स्थानिक रोटरी क्लब व एरीस अॅग्रो यांचे संयुक्त विद्यमाने तावी, केसलापार, रावी रासा या भीषण पाणी टंचाई असणार्...