मुंबईचे माजी पोलीस आयुक्त मागील अनेक दिवसांपासून फरार आहेत. त्यांचा अटक वारंट महाराष्ट्र पोलिसांच्या गुप्तचर विभागाने काढला आहे. यावर भाजपाने टीका केली आहे. अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा गुपत्चर विभागाला लागत नाही, हे आश्चर्यच आहे. अशी टीका भाजपाने केली आहे.
दाऊद इब्राहिम चा सहकारी तारिक परवीन याला पोलिसांनी अटक केलेली आहे त्याने दिलेल्या जवाबानुसार मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना आरोपी करण्यात आले आहे. मात्र तेव्हापासून परमबीर सिंह हे फरार आहेत. त्यानंतर गुप्तचर विभागाने पंजाब, चंदीगड आणि मुंबई या तीन ठिकाणी त्यांचे वास्तव्य असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र या तीनही ठिकाणी ते नसल्याचे सांगितले.
अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा महाराष्ट्राच्या गुप्तचर विभागाला मिळू नये हे आश्चर्यच आहे. याप्रकरणी भाजपाने आघाडी सरकार व मुंबई पोलिसांवर निषाना साधला आहे, ‘अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा महाराष्ट्राच्या गुप्तचर विभागाला मिळू नये हे आश्चर्यच आहे. याबाबतीत ते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मार्गदर्शन घेत असावेत.’ असा टोला ट्विट करत लगावला आहे.