कोल्हापूर येथील शिरोळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज तक्त्यात आंदोलन अंकुश, जय शिवराय शेतकरी संघटना व बळिराजा शेतकरी संघटनेच्या वतीने पाचवी एल्गार ऊस परिषद घेण्यात आली. यावेळी चालू हंगामात कारखान्यांनी ऊस उत्पादकांना एफआरपीनुसार देण्यात येणारी रक्कम पाचशे रुपये वाढवून द्यावेत. गळित हंगाम संपल्यानंतर उर्वरित ५०० रुपये न दिल्यास कायदेशीर लढाईने ऊस उत्पादकांना पाचशे रुपये मिळवून देऊ, असे धनाजी चुडमुंगे म्हणाले. यावेळी दीपक पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका केली. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकरी संघटना न राहता राजकीय संघटना बनल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.
यावेळी धनाजी चुडमुंगे, शिवाजी माने, बी. जी. पाटील, दीपक पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर प्रचंड टीका केली. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकरी संघटना न राहता राजकीय संघटना बनली आहे. असा आरोपही करण्यात आला आहे. यावेळी धनाजी चुडमुंगे म्हणाले, गेल्यावर्षी गाळप केलेल्या उसास एफआरपीची रक्कम अधिक दोनशे रुपये, कायदेशीर लढाई केल्यास मिळणार आहेत. मात्र यासाठी शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून घेणाऱ्या नेत्याने कोणताही आवाज उठवला नाही.