नागपूर: मायक्रोब्लॉगिंग स्वदेशी अँप koo ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. koo ने लाँच झाल्यानंतर त्याचे सर्व फीचर्स बाजारात आणले त्यात काही विशेष फीचर्सचा पण समावेश आहे. koo अँपने मार्च २०२० मध्ये सोशल नेटवर्किंगच्या जगात पाय ठेवल्यावर देशातील वेगवेगळ्या कोपऱ्यात विशेष म्हणजे ग्रामीण भागात त्यांचे उत्तम फीचर्स वापरून या माध्यमातून अभिव्यक्ति स्वतंत्र दिले आहे. koo अँपला इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलगू सहित १० भारतीय भाषांमध्ये वापरल्या जाऊ शकते.
koo अँप ट्विटरला टक्कर देणारे आहे.
koo अँपचे विशेष फिचर MLK फिचर म्हणे अनेक भाषांमध्ये भाषांतर करण्याची सुविधा
तूमच्यातील अनेक लोक koo अँपचा वापर करत असाल. koo मधील विशेष बाब म्हणजे हे दहा भाषांमध्ये सपोर्ट करत. हि सुविधा कोणत्याही इतर सोशल मीडिया अँपमध्ये नाही. koo app ने MLK म्हणजेच Multi-Lingual Koo (बहुभाषी कू) फिचर समोर आणले आहे. याविषयी अनेक जणांना हि गोष्ट माहिती नाही आहे.
बहुभाषी फिचरच्या मदतीने तूम्ही koo अँपवर रिअल टाइममध्ये हिंदी, मराठी, कन्नड, तामिळ, असामी, बंगाली, तेलगू, पंजाबी, गुजराती आणि इंग्रजी यामधून कोणत्याही एका भाषेत मेसेजचा यातील कोणत्याही भाषेमध्ये लगेच भाषांतर करू शकता. या फिचरची विशेषता म्हणजे अशी कि, मेसेज ज्या भाषेत आहे तो त्याच संदर्भात राहून ट्रांसलेट होऊन मेसेज चालला जातो.