नाशिक: मराठीचे शिलेदार संस्थेच्या नाशिक येथील प्रसिद्ध कवयित्री आशा गोवर्धने यांच्या ‘हिरकणी’ या पहिल्याच कविता संग्रहाचे प्रकाशन अखिल भारतीय पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र देशपांडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत नाशिक येथे उत्साहात पार पडले.
याप्रसंगी अखिल भारतीय पत्रकार संघाच्या स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्काराने कवियत्री आशा गोवर्धने यांना सन्मानित करण्यात आले. आयोजित सोहळ्यास प्रसिद्ध अभिनेते चिन्मय उदगीरकर, मिसेस ग्लोबल युनिव्हर्स 2021 संगीत खैरनार, सोनी पैठणी संचालक माननीय संजयजी सोनी, जिल्हा माहिती अधिकारी माननीय रणजीत सिंह राजपूत , लायन्स क्लब नाशिक माननीय नानासाहेब चव्हाण, अभिनेत्री मॉडेल जयश्री चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.