तालिबानला अफगाणिस्तानवर ताबा मिळवून 100 दिवस पूर्ण झाले आहेत. एखादा देश काबीज करणे सोपे असते, परंतु तो देश चालवणे फार कठीण आहे. तालिबान अजूनही आपल्या सरकारला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळावी यासाठी विनंती करत आहे. मंगळवारी, तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवून 100 दिवस पूर्ण केले आहेत. परराष्ट्र मंत्री अमीर खान मुट्टाकी यांनी तालिबान सरकारला जागतिक मान्यता मिळवून देण्यासाठी अनेक राजनैतिक प्रयत्न केले, परंतु ते सर्व अयशस्वी ठरले. या सरकारचे नेतृत्व मौलवी हिबतुल्ला अखुंदजादा करत आहेत. जे अफगाणिस्तानातील तालिबान सरकारमधील सर्वोच्च नेते आहेत.
दरम्यान, तालिबान्यांनी संबंध निर्माण करण्यासाठी आणि देशातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अनेक प्रादेशिक आणि इतर देशांना भेटी दिल्या आहेत. त्यानंतर किमान सहा देशांच्या प्रतिनिधींनी अफगाणिस्तानला भेट देऊन तालिबानच्या नेतृत्वासोबत बैठका घेतल्या. या 100 दिवसांत अफगाणिस्तानमध्ये सहा महत्त्वाच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय बैठका झाल्या आहेत. अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर इराण, पाकिस्तान, भारत, रशिया आणि चीनने बैठका आयोजित केल्या आहेत. याशिवाय जी-20 देशांचे नेते आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतही अफगाणिस्तानातील परिस्थितीवर चर्चा झाली आहे.