अफगाणिस्तानात मदत घेऊन जाणाऱ्या पाकिस्तानी ट्रकवरचा झेंडा तालिबानी फायटर्सनी फाडून टाकला. अफगाणिस्तानमधील काबुल आणि इतर भागांना जीवनावश्यक वस्तूंचा पाकिस्तानकडून पुरवठा केला जात आहे. त्यासाठी पाकिस्तानी ट्रक अफगाणिस्तानच्या विविध भागात फिरत असल्याचं चित्र आहे. असाच एक पाकिस्तानचा झेंडा लावलेला ट्रक पाहून तालिबान्यांना संताप अनावर झाला. त्यांनी हा ट्रक रोखला आणि त्यावरील पाकिस्तानचा झेंडा उतरवून फाडून टाकला.
पाकिस्तानकडून अफगाणिस्तानला सध्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे या ट्रकवर पाक-अफगाणिस्तान को-ऑपरेशन फोरम असं लिहिलेलं होतं. दोन्ही देशांच्या परस्पर सहमतीनं सुरू असलेल्या या उपक्रमातील पाकिस्तानी झेंडा तालिबान्यांना सहन न झाल्याने त्यांनी तो फाडून टाकला. या ट्रक ड्रायव्हरला तालिबान्यांकडून धमकावलं गेल्याचंही समजतं. पुन्हा ट्रकवर अशा प्रकारे पाकिस्तानी झेंडा न लावण्याची धमकी तालिबान्यांनी पाकला दिली आहे.