केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या ( सीबीआय ) कार्यपद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. ‘तुम्ही आतापर्यंत किती खटल्यांची सुनावणी केली. किती जणांना शिक्षा सुनावली आणि सध्या विभागाकडे किती प्रकरणे पेडिंग आहेत, याची सविस्तर माहिती द्यावी’, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय ला दिला. सीबीआयच्या कामाचे मूल्यांकन करणार असल्याचेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.
एका प्रकरणात सीबीआयने तब्बल ५४२ दिवसांनंतर अपील केले. यावर नाराजी व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि एमएस सुंदरेश यांच्या खंडपीठाने आदेश दिले की, सीबीआयने आतापर्यंत तुम्ही आतापर्यंत उच्च न्यायालय व विशेष न्यायालयात किती जणांना शिक्षा सुनावली आणि सध्या विभागाकडे किती प्रकरणे पेडिंग आहेत. तसेच सीबीआय संचालकांनी कायदेशीररित्या सक्षम होण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या याची माहिती द्यावी. सीबीआयची जबाबदारी स्पष्ट होणे गरजेचे आहे, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.
तुमचे काम केवळ गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे नाही
सीबीआयचे काम केवळ एखाद्या प्रकरणात गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे नाही. तर खटल्याची सुनावणी होवून त्याचा निकाल लागेपर्यंत याचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. आतापर्यंत सीबीआयने तपास करुन आरोपींना शिक्षा झालेल्या खटल्यांची माहिती सादर करावी. तसेच विविध न्यायालयात पेडिंग असणार्या प्रकरणाचा कालावधीचीही माहिती सादर करावे, असेही खंडपीठाने सुनावले.