फडणवीस साईडलाईनला जाण्याची लक्षणं?
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) केंद्रीय नेतृत्वाच्या अलीकडील काही निर्णयांमुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाकी आणि असुरक्षित स्थितीत आहेत. महाराष्ट्राचा नवा चेहरा, जाणकार, पुढील हिंदुत्ववादी नेता म्हणून पक्षाने त्यांना सतत राष्ट्रीय मंचावर पुढे आणले होते. मात्र आता गेल्या तीन दिवसांत विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीस ते भाजप सरचिटणीस या पदावर झालेली बढती आणि महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी हे त्याचेच संकेत आहेत. दोघेही फडणवीसांचे कट्टर विरोधक आहेत. या निर्णयांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की केंद्रीय नेतृत्वाने आपल्या पक्षाचा चेहरा म्हणून ओळख असलेल्या नेत्याचे पंख छाटण्यास सुरुवात केली आहे.
२०१९च्या विधानसभा निवडणुकीसाठी विनोद तावडेंना तिकीट नाकारले
फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात माजी शिक्षणमंत्री तावडे यांना बाजूला सारले होते. मंत्रिमंडळात विभाग बदलण्यापासून अखेर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी मराठा नेते असणाऱ्या विनोद तावडेंना तिकीट नाकारण्यात आले होते. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चांगले संबंध असणाऱ्या नागपुरातील माजी ऊर्जामंत्री आणि ओबीसी समाजाचे नेते चंद्रकांत बावनकुळे यांनाही तिकीट देण्यात आले नाही. त्यामुळे विदर्भातील किमान सहा जागांवर भाजपाचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे.
तावडे आणि बावनकुळे यांना तिकीट नाकारण्याच्या निर्णय म्हणजे घोडचूक
“तावडे आणि बावनकुळे यांचे पुनर्वसन हे फडणवीस यांचे पक्षातील वजन कमी झाल्याचे लक्षण आहे. आम्ही त्यांच्या क्षमतेवर किंवा सचोटीवर शंका घेत नसलो तरी पक्ष व्यावहारिक राजकारणात परत येईल. केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राजकारण चालेल, पण २०२४ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात ते चालणार नाही. पक्ष ओबीसी आणि मराठा समाजाला विरोध करू शकत नाही,” असे भाजपा उपाध्यक्षांनी म्हटले आहे. तावडे आणि बावनकुळे यांना तिकीट नाकारण्याच्या निर्णयाला घोडचूक असल्याचे भाजपच्या उपाध्यक्षांनी म्हटले. त्या वेळी, अनेकांनी याचे वर्णन धाडसी निर्णय म्हणून केले होते, पण यामुळे त्यांच्या मतदारसंघात गोंधळ निर्माण झाला.