1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

चीनच्या ‘फुजीयान’मध्ये कोरोनाचे थैमान

fujian
Spread the love

जागतिक स्तरावर कोरोनास महामारी म्हणून घोषित केल्यानंतर कोविडचा सर्वनाश करण्यासाठी हवे तसे प्रयत्न यशस्वी होतांना दिसत नाही.चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर या व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले. असे असताना चीनमध्ये गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या कमी झाली होती. पण आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोना बाधितांची संख्या चीनच्या दक्षिणपूर्व फुजियान भागात झपाट्याने वाढत असल्याचे चित्र दिसत असल्यामुळे पुतियान शहरातील चित्रपटगृह, जीम, महामार्ग बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर रहिवाशांना शहर न सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सरकारने हा निर्णय कोरोनाचा उद्रेक पाहता घेतला आहे.

कोरोना बाधितांची संख्या फुजियानमधील पुतियान शहरात वाढत आहे. यासाठी चीन आरोग्य विभागाने या ठिकाणी तपासणीसाठी एक तज्ज्ञांची टीम पाठवली आहे. कोरोनाचे संकट पाहता तेथील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. १३ सप्टेंबरला ५९ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर प्रशासन ख़डबडून जागे झाले आहे. १२ सप्टेंबरला ही संख्या २२ होती. रुग्णसंख्या दुप्पटीने वाढल्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे योग्य वेळी पावले उचलली नाहीत, तर कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

५ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या फुजियान भागात अवघ्या चार दिवसात १०२ रुग्ण आढळले आहेत. राष्ट्रीय सुट्ट्या १ ऑक्टोबरपासून सुरु होत आहेत. पर्यटक फुजियानला पर्यटनासाठी मोठ्या संख्येने येतात. पण कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता यावर प्रशासनाने निर्बंध आणले आहेत. त्याचा पर्यटन आणि वाहतूक क्षेत्राला फटका बसला आहे.

Claim Free Bets

चीनमध्ये १२ सप्टेंबरपर्यंत एकूण ९५ हजार २४८ कोरोना रुग्ण आढळले. तर ४ हजार ६३६ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा उद्रेक शेवटचा चीनच्या जियांगसू भागात झाला होता. दोन आठवड्यापूर्वी तेथील स्थिती नियंत्रणात आली आहे. पण आता पुतियानमध्ये आढळून आलेल्या रुग्णांमध्ये डेल्टा रुग्ण अधिक असल्याचे समोर आल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ओमिक्रॉनवर प्रभावी फायझरच्या गोळीला आपत्कालीन मंजुरी

    December 17th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveयुरोपियन युनियनच्या औषध नियामक विभागाने कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटशी दोन हात करणाऱ्या फायझरच्या को...

    युद्धाचा पहिला दिवस; 137 जणांचा मृत्यू

    February 25th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveरशियाने गुरुवारी युक्रेनवर चौफेर हल्ले केले. युद्धाच्या पहिल्या दिवशी 137 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे...

    अफगाणिस्तानात सत्ता स्थापनेच्या हालचालीस वेग

    September 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापनेच्या हलचालींना वेग आलाय. तालिबानने सत्ता स्थापन करण्यासाठी आणि नवीन मंत्रीमंड...