1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

राज्यातील शैक्षणिक वर्ष 13 जून पासून सुरू होणार

thumbnail-thefreemedia
Spread the love

तर विदर्भातील शाळा २४ ते २५ जूनपासून

मुंबई: राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णयानुसार येत्या 13 जून पासून (दुसरा सोमवार) शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. तर, दि. 15 जून 2022 पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना निर्गमित करण्यात याव्यात, असे निर्देश शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता तेथील शैक्षणिक वर्ष 23 जून रोजी सुरू होऊन चौथा सोमवार, दि. 27 जून 2022 रोजी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दि. 13 ते 14 जून 2022 रोजी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता करणे, शाळेचे सौंदर्यीकरण करणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड-19 प्रार्दुभाव तसेच आरोग्यविषयक बाबीच्या अनुषंगाने उद्बोधन करणे याचे आयोजन करण्यात यावे. तसेच विदर्भातील शाळांबाबत दि. 24 ते 25 जून 2022 रोजी या बाबींचे आयोजन करण्यात येऊन दि. 27 जून 2022 पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना द्याव्यात, असे या निर्देशात स्पष्ट करण्यात आले आहे.

शासन, आरोग्य विभाग, स्थानिक आपत्ती कक्षाकडून वेळोवेळी देण्यात आलेले तसेच यापुढे देण्यात येणारे निर्देश / सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता घेण्याचे तसेच शाळेमध्ये येणाऱ्या मुलांचे/ पालकांचे कोविड-19 प्रार्दुभावाच्या अनुषंगाने प्रबोधन/ उद्बोधन करण्यात यावे, असे निर्देशही मांढरे यांनी दिले आहेत.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अखेर भाजप-मनसेची हातमिळवणी; जागांसंदर्भात झाला महत्व...

    September 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये युती होणार...

    “आम्ही गांधीजींना सोडलं नाही, मग तुम्ही कोण ?&...

    September 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveकर्नाटक हिंदू महासभेचे सचिव धर्मेंद्र यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आणि भाजपसंदर्भात वादग्रस्त...

    संभाजीराजेंचा संत तुकारामांच्या अभंगातून शिवसेनेला टोला

    June 11th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveमागील काही दिवसांपासून राज्यात राज्यसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होता. अखेर या निवडणुकीचा निकाल समोर आला अ...