दिल्ली विधानसभेत गुरुवारी एक बोगद्यासारखी रचना सापडली आहे.
एएनआय शी बोलतांना दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष राम निवास गोयल यांनी म्हटले की सापडलेला बोगद्यासारखी रचना हा विधानसभेला लाल किल्ल्याशी जोडतो.
त्यांनी सांगितले कि, स्वातंत्र्य सैनिकांची ने-आण करताना ब्रिटिशांकडून त्याचा वापर केला जात असे.
“जेव्हा मी १९९३ मध्ये आमदार झालो होतो, तेव्हा येथे एका बोगद्याबद्दल अफवा पसरली होती जी लाल किल्ल्याकडे जाते आणि मी त्याचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्याबद्दल स्पष्टता नव्हती,’असे दिल्ली विधानसभा अध्यक्ष राम निवास गोयल म्हणाले.
ते म्हणाले, ‘आता आम्हाला बोगद्याचा शेवट सापडला आहे, पण आम्ही तो पुढे खोदणार नाही.
मेट्रो प्रकल्प आणि गटार लाईन बांधणीमुळे बोगद्याचे सर्व मार्ग नष्ट झाले आहेत.
लवकरच आम्ही त्याचे नूतनीकरण करू आणि ते लोकांसाठी बघण्याकरिता उपलब्ध करू.
पुढील वर्षी १५ ऑगस्टपर्यंत नूतनीकरणाचे काम पूर्ण होईल अशी आशा आहे, असे दिल्ली विधानसभा अध्यक्ष राम निवास गोयल म्हणालेत.
त्यांनी पुढे म्हटले कि, आम्ही सर्व येथे असलेल्या फाशीच्या खोलीविषयी ( (gallows room) जाणत होतो, पण कधी त्याला उघडले नाही.
आता स्वातंत्र्यच्या ७५ व्यावर्षी त्या खोलीचे निरीक्षण करण्याच्या निर्णय घेतला. आम्हाला ती खोली स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली म्हणून त्याचा कायापालट करून मंदिराच्या स्वरूपात तयार करायची इच्छा आहे.
विधानसभा अध्यक्ष म्हणाले की, दिल्ली विधानसभेच्या देशाच्या स्वातंत्र्याचा संबंधित इतिहास पाहता, पुढील स्वातंत्र्यदिन पर्यंत पर्यटकांसाठी फाशीची खोली (gallows room) उघडण्याचा त्यांचा मानस आहे आणि त्यासाठी आधीच काम सुरू झाले आहे.
ते म्हणाले, ‘स्वातंत्र्यलढ्याच्या संदर्भात या ठिकाणाचा इतिहास खूप समृद्ध आहे.
त्याची पुनर्रचना करण्याचा आमचा हेतू आहे जेणेकरून पर्यटक आणि येणाऱ्या पिढीला आपल्या इतिहासाचे प्रतिबिंब मिळेल.