मुंबई येथील एनसीबी च्या पथकाने मोजे मांजरम तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे पहाटे पाच च्या सुमारास सापळा रचून MH26 AD 2165 या क्रमांकाच्या गाडीत 7 ते 8 कोटी रुपयाचा गाांजा पकडला आहे. दरम्यान मुंबई एनसीबी च्या पथकाकडून कारवाई करणे चालू आहे. या संबंधित पथकाचे जबाबदार ऑफिसर अमोल मोरे, सुदाकर शिंदे, संजय गवली, प्रमोद मोरे, कृष्णा पारमदरेकर, यांनी कारवाई केली.
या संबंधित प्रशासनाला सहकार्य गजानन पाटील चव्हाण, सरपंच श्रीकांत नीळकंठ मांजरमकर, पोलीस पाटील जयराज पाटील शिंदे, वसंत शिंदे, इंद्रजीत पटवे, बापूराव पटवे, सह मांजरम येथील सर्व जबाबदार ज्येष्ठ नागरिक माजी माजी सरपंच पदाधिकारी व मांजरम येथील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणामध्ये एनसीबी च्या पथकांना वेळोवेळी सहकार्य केले. तसेच पुढील कारवाई संबंधित प्रशासनाच्या स्तरावर चालू आहे.