उत्तर प्रदेशातील बरेली मध्ये काँग्रेसच्या ‘लड़की हूं, लड़ सकती हूं’ मॅरेथॉनमध्ये चेंगराचेंगरी सारखी स्थिती झाली. जिथे अनेक मुलींची धक्काबुक्की झाली. त्यामुळे अनेकांना दुखापत झाली. अनेक महिला आणि किशोरवयीनांच्या चेहऱ्यावरून मास्कही गायब असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
मास्कशिवाय मॅरेथॉनमध्ये किशोरवयीन मुली मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.शर्यत सुरू असतानाच पुढे असलेल्या काही महिला पडल्या. त्यानंतर मागून येणारी गर्दी थांबत नव्हती. मात्र, तेथे उभ्या असलेल्या अनेकांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला.
मात्र तरीही सुमारे 20 मुली जमिनीवर पडल्या होत्या. यावेळी आरडाओरड झाल्याने अनेक मुलींचे जोडे, चप्पल रस्त्यावर विखुरल्या होत्या. यात जखमी झालेल्या तीन मुलींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. शहर पोलीस तपासासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
काँग्रेस नेता आणि बरेलीचे माजी महापौर सुप्रिया एरन यांनी याचे आयोजन केले होते. त्यांचे म्हणणे आहे कि, यावर चिंता करण्याचे काही कारण नाही. एरन यांनी म्हटले, ‘हजारो लोक वैष्णोदेवीला गेले होते. त्या बद्दल काय? बघा, हा मानवी स्वभाव आहे की आपण आधी पुढे जावे, या शाळकरी मुली आहेत आणि त्यांनी देखील तसेच केले. पण जर कोणाला काही कारणाने वाईट वाटले असेल तर मी काँग्रेसच्या वतीने माफी मागू इच्छितो.