देशात सलग पाचव्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले. देशात 9 सप्टेंबरपासून कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 25,404 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 339 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 37,127 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
केरळमधील कोरोनाबाधितांच्या नव्या रुग्णांमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवारी केरळमध्ये 15,058 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आल्यामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढून 43 लाख 90 हजार 489 झाली आहे. तसेच 99 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत केरळात कोरोनामुळे 22,650 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 32 लाख 89 हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 43 हजार 213 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 24 लाख 84 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून कमी आहे. एकूण 3 लाख 62 हजार 207 रुग्णांना अद्यापही कोरोनावर उपचार घेत आहेत.