1. Coronavirus pandemic live updates: India reports a single-day rise of 253 new Covid cases in India 2. ‘I carry India with me wherever I go’: Google and Alphabet CEO Sundar Pichai 3. Aaftab used Chinese knife to dismember Shraddha's body, chopped her 1. कोरोनाव्हायरस (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला लाइव्ह अपडेट्स: भारतात एकाच दिवसात 253 नवीन कोविड प्रकरणांची नोंद झाली आहे 2. ‘मी जिथे जातो तिथे भारताला माझ्यासोबत घेऊन जातो’: गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई 3. श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी आफताबने चायनीज चाकू वापरला, आधी तिचे हात कापले: सूत्र

जितेंद्र आव्हाडांनी घेतलेल्या निर्णयास शिंदे सरकारकडून तिलांजली

Shinde government

आता म्हाडाच घेणार सर्वस्वी निर्णय

मुंबई : राज्यातील गृहनिर्माण असो की म्हाडाचे निर्णय असो सर्व स्तरावरील निर्णयाच्या प्रत्येक नस्तीला शासन मंजुरी आवश्यक करणारे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या काळातील सर्व शासन निर्णयास शिंदे सरकारनी तिलांजली दिली असून, आता हे सर्व अधिकार पुन्हा ‘महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणा’ला (म्हाडा) तसेच विभागीय मंडळांना बहाल करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटप झालेले नव्हते तरीही याचे महत्त्व ओळखून याबाबत गृहनिर्माण विभागाला आदेश दिले होते.

महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात आव्हाड यांनी अनेक निर्णय घेताना सर्वाधिकार शासनाकडे घेतले होते. त्यामुळे ‘म्हाडा’ची अवस्था फक्त प्रस्ताव तयार करून ते शासनाकडे पाठविण्यापुरतीच मर्यादीत राहिली होती. अतिरिक्त चटईक्षेत्रफळाचे वितरण, म्हाडा वसाहतींचे पुनर्विकास प्रस्ताव, बृहदसूचीवरील रहिवाशांना घरांचे वाटप, सर्व स्तरातील अभियंते-कर्मचाऱ्यांच्या बदल्या, जुन्या इमारतींच्या पुनर्विकासांसाठी ना हरकत प्रमाणपत्र, टिटबिट भूखंड, प्राधिकरणातील ठराव आदी सर्वच प्रस्तावांना शासन मंजुरी आवश्यक करण्यात आली होती. त्यामुळे आर्थिक मलिद्याचे ‘एक टेबल’ वाढल्याची चर्चा होती. मात्र गृहनिर्माण विभागाचा कार्यभार येताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व निर्णय रद्द करून म्हाडाला पूर्वीप्रमाणेच अधिकार बहाल करण्याचे आदेश गृहनिर्माण विभागाला दिले होते. त्यानुसार गुरुवारी प्रत्येक निर्णय रद्द करण्यात आले.

फडणवीस यांनी अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेत तो अमलात आला आहे. त्यामुळे आता नवे गृहनिर्माण मंत्री आले तरी या निर्णयात बदल होण्याची शक्यता कमी आहे. प्रकाश मेहता हे गृहनिर्माण मंत्री असताना अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले होते. मात्र मेहता यांच्या जागी राधाकृष्ण विखे-पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी म्हाडा स्तरावरील बदल्या, नियुक्त्या व इतर सर्व निर्णयांना शासनाची मंजुरी आवश्यक केली होती. म्हाडा अध्यक्ष असलेल्या उदय सामंत यांना शह देण्यासाठी विखेपाटील यांनी हे निर्णय घेतले होते. आव्हाड यांनी तर सर्वच निर्णय शासनाकडे घेतले होते. म्हाडाचे उपाध्यक्ष, गृहनिर्माण सचिव यांच्या चाळणीतून शासनाकडे आलेल्या प्रस्तावावर अभ्यास होऊन योग्य तो निर्णय घेतला जात होता. त्यामुळे आपण त्या काळात घेतलेल्या निर्णयांचे समर्थन करतो, अशी प्रतिक्रिया माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

Avatar

RAHUL PATIL

All Posts

Latest News

Related Post

आनंदराव अडसूळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता ?

October 1st, 2021 | RAHUL PATIL

सिटी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीने समन्स बजावले होते. त्याविरोधात अडसूळ यांनी...

आज आंतरराष्ट्रीय ‘लोकशाही’ दिवस; डॉ. बाब...

September 15th, 2021 | RAHUL PATIL

आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो.  आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन जगातील ...

मुख्यमंत्र्यांनी अयोध्या दौरा करावा मात्र त्यावर राज...

October 27th, 2022 | RENUKA KINHEKAR

नागपूर: अजित पवार यांच्यासारखे व्यक्ती राज्याच्या मुख्यमंत्री पदावर असल्यास  राज्याचा नक्कीच फायदा  हो...