14 ते 17 मे या कालावधीत होणार हवाई सर्वेक्षण: रावसाहेब पाटील दानवे
रेल्वे मंत्रालयाच्या वतीने जालना ते जळगाव या रेल्वे मार्गाच्या ” अंतिम स्थान सर्वेक्षण” याला केंद्रीय रेल्वे, राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी यंदा 8 फेब्रुवारी रोजी मंजूरी दिली होती.
जालना आणि जळगाव जिल्ह्यातील लोकांना सोयीस्कर ठरणाऱ्या या 174 किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्गाच्या प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम सुरु असून या मार्गाचे हवाई सर्वेक्षण ही केले जाणार असून त्यासाठी लागणारे विशिष्ट विमान आज अकोला येथे दाखल झाले आहे. या विमानाद्वारे रडार (लिडार) चा वापर करुन एका दिवसाला 50 किलोमीटर
हवाई इतके सर्वेक्षण केले जाणार आहे.
14 ते 17 मे 2022 या चार दिवसांत हे हवाई सर्वेक्षण होणारअसल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली.यासाठी सुमारे 4.5 कोटी रुपयांच्या निधीही मंजुरी मिळाली असून अंतिम स्थान सर्वेक्षण झाल्यानंतर हा प्रस्ताव स्विकृतीसाठी रेल्वे बोर्डाकडे जाईल,असे दानवे म्हणाले. जालना जळगाव रेल्वेमुळे मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील औद्योगिक विकासासह, शेती, व्यापार, दळणवळण, लघुउद्योग, पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे