रशियाने गुरुवारी युक्रेनवर चौफेर हल्ले केले. युद्धाच्या पहिल्या दिवशी 137 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यात ७४ लष्करी तळ उद्ध्वस्त झाले असून, ४० सैनिकांसह १० नागरिक ठार झाल़े. या युद्धखोरीचा निषेध करत पाश्चात्य देशांनी रशियावर आणखी निर्बंध लागू करण्याची घोषणा केली़ आहे.
रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी युक्रेनविरोधात सैनिकी कारवाई करण्याचे आदेश रशियन सैन्याला दिले आहेत. शस्त्र खाली टाकत युक्रेनने आत्मसमर्पण करावे, असे रशियाने म्हटलं आहे. पुतीन यांच्या या निर्णयामुळे पाश्चात्य देशांमध्ये खळबळ उडाली आहे.
पुतीन यांच्या निर्णयाचा अमेरिकेने निषेध नोंदवला आहे. रशियाच्या या निर्णयावर अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनी चांगलेच संतापलेले दिसत आहेत. अमेरिका आणि ब्रिटननेही रशिया आणि युक्रेन या दोन्ही प्रदेशांवर कडक निर्बंध लादण्यास सुरवात केली.