मनी लाँड्रिंग आणि १०० कोटी वसुली प्रकरणी अखेर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाकडून अटक करण्यात आले आहे. १३ तासांच्या चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली असून या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत म्हंटले की, १०० कोटींच्या वसुलीप्रकरणातील पहिली विकेट पडलेली आहे, कॅप्टनसह सगळे याच मार्गाने जातील.’ असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. तसेच पुढे आणखी एक ट्वीट करत ‘अनिल देशमुख हे तर प्यादे होते, प्रकरण सुत्रधारापर्यंत नक्कीच जाणार…’ असे म्हणत सूचक संकेत दिले आहे.